

Team India: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. वनडेत ३ दुहेरी शतके झळकावण्याचा विक्रम हा रोहित शर्माच्या नावे आहे. मात्र गेल्या काही महिन्यात त्याची कामगिरी खालावली आहे. डावाची सुरुवात करताना तो हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. संघाचा कर्णधार असल्यामुळे त्याला संघाबाहेर देखील करता येत नाही. दरम्यान रोहित शर्मामुळे ३ असे फलंदाज आहेत ज्यांना संधी मिळणं कठीण झालं आहे .
१) पृथ्वी शॉ:
रोहित शर्मामुळे काही युवा खेळाडूंना संधी मिळणं कठीण झालं आहे, त्यापैकीच एक फलंदाज म्हणजे पृथ्वी शॉ. २३ वर्षीय आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉला भारतीय संघासाठी खेळण्याची खूप कमी संधी मिळाली आहे.
आयपीएल २०२३ स्पर्धेत त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी दमदार राहिली आहे. असं असताना देखील त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं नाही.
पृथ्वी शॉची फलंदाजी स्टाईल ही वीरेंद्र सेहवागसारखी आहे. मात्र संधी मिळत नसल्याने तो स्वतःला सिद्ध करू शकलेला नाही.
२)ऋतुराज गायकवाड:
ऋतुराज गायकवाड हा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत आणि आयपीएल स्पर्धेत धावांचा पाऊस पाडतोय. मात्र तरीदेखील त्याला स्वतःला सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळत नाही. जोरदार फॉर्ममध्ये असूनही त्याला सतत दुर्लक्ष केलं जात आहे. भारतीय संघाला येणाऱ्या काही दिवसात काही महत्वाच्या स्पर्धा पाहता ऋतुराज गायकवाडला संधी मिळणं गरजेचं आहे. (Latest sports updates)
३) देवदत्त पडिक्कल:
देवदत्त पडिक्कल हा भारतीय संघातील आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. आयपीएल स्पर्धेत खेळताना त्याने आपल्या संघाला अनेकदा दमदार सुरूवात करुन दिली आहे. देवदत्त पडिक्कलकडे पहिल्या चेंडूपासूनच हल्ला चढवण्याची क्षमता आहे.
रोहित शर्माचं संघातील स्थान वाचवण्यासाठी टीम मॅनेजमेंट देवदत्त पडिक्कलकडे दुर्लक्ष करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.