T-20 World Cup 2024: या दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा! तारीख आली समोर

ICC T20 World Cup 2024 Date: आयपीएल २०२४ स्पर्धा ही भारतीय खेळाडूंसाठी अतिशय महत्वाची आहे. कारण ही स्पर्धा झाल्यानंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
Indian team for the T20I World Cup set to announce on April 30th or May 1st says reports amd2000
Indian team for the T20I World Cup set to announce on April 30th or May 1st says reports amd2000twitter

T20 World Cup 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धा ही भारतीय खेळाडूंसाठी अतिशय महत्वाची आहे. कारण ही स्पर्धा झाल्यानंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा येत्या १ जूनपासून वेस्टइंडिज आणि अमेरिकेत रंगणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

केव्हा होणार भारतीय संघाची घोषणा?

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार?असा प्रश्न असंख्य क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. या संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. या स्पर्धेसाठी १५ खेळाडूंची निवड करणं हे निवडकर्त्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. दरम्यान स्पोर्ट्स तकने दिलेल्या वृत्तानुसार येत्या ३० एप्रिल किंवा १ मे रोजी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

Indian team for the T20I World Cup set to announce on April 30th or May 1st says reports amd2000
IPL 2024: वानिंदु हसरंगाच्या रिप्लेसमेंटची घोषणा! या स्टार खेळाडूला मिळाली संधी

केव्हा होणार स्पर्धा?

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार १ जूनपासून वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांचा थरार १ जून ते १८ जूनदरम्यान रंगणार आहे. तर १९ ते २४ जूनदरम्यान सुपर ८, २६ आणि २८ जून रोजी वर्ल्डकप सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. स्पर्धेतील अंतिम सामना २९ जून रोजी रंगणार आहे. (Cricket news in marathi)

Indian team for the T20I World Cup set to announce on April 30th or May 1st says reports amd2000
IPL 2024: किंग कोहलीचा Orange Cap वर कब्जा! Purple Cap कुणाच्या डोक्यावर?

रिषभ पंतला संधी मिळणार...

टी-२० वर्ल्डकपसाठी निवडण्यात येणाऱ्या भारतीय संघात रिषभ पंतलाही संधी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. क्रिकबझने दिलेल्या वृ्त्तानुसार रिषभ पंतला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान दिले जाऊ शकते. कार अपघात झाल्यानंतर रिषभ पंतला गेले काही महिने संघाबाहेर राहावं लागलं होतं. आता तो आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करतोय. रिषभ पंतसह, केएल राहुल, ध्रुव जुरेल, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि संजू सॅमसन यांची देखील नावं चर्चेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com