indian cricket team
indian cricket team saam tv

World Cup 2023, Fitness Test: भारतीय खेळाडूंची चिंता वाढली! वर्ल्डकप संघात स्थान ठेवण्यासाठी BCCI ने ठेवलीय ही अट

BCCI On Team India Squad Selection: आगामी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा भारतात रंगणार आहे

Team India Fitness Test For World Cup 2023:

आगामी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा भारतात रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे.

या स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. मात्र भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना काही चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण कराव्या लागतील.

indian cricket team
Jasprit Bumrah Record: कमबॅकनंतर पहिल्याच सामन्यात बुमराहचा मोठा रेकॉर्ड; रोहित अन् विराटसारख्या दिग्गजांच्या यादीत प्रवेश

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, ' जे खेळाडू आयर्लंड दौऱ्यावर होते त्या खेळाडूंना वगळता इतर खेळाडूंना फिटनेस टेस्ट अनिवार्य असणार आहे. तसेच त्यांच्या ब्लड टेस्ट देखील केली जाणार आहे. ' ज्यात लिपिड प्रोफाईल, ब्लड शुगर, युरिक ॲसिड, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२ आणि डी, क्रिएटिनिन आणि टेस्टोस्टरेन यांचा समावेश असणार आहे.

तसेच खेळाडूंना डेक्सा टेस्ट देखील द्यावी लागणार आहे. याबाबत बोलताना NCA च्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, ' यात काही नवीन नाही. जेव्हा मालिकेदरम्यान खेळाडू विश्रांती घेतात त्यावेळी ही टेस्ट घेतली जाते.' (Latest sports updates)

indian cricket team
IND VS IRE 3rd T2OI: 'हे खूप निराशाजनक होतं..' मालिका जिंकूनही कॅप्टन बुमराह या कारणामुळे नाराज

९ तास झोपण्याशिवाय पर्याय नाही...

तसेच NCA च्या अधिकाऱ्याने पुढे म्हटले की, ' जेव्हा आपण आणि पुनर्वसन प्रक्रियेबद्दल बोलतो तेव्हा झोपण्याशिवाय उत्तम पर्याय नसतो. ८ ते ९ तासांची गाढ झोप ही खूप गरजेची असते. हे सत्य आहे की, ८ ते ९ तास गाढ झोप मिळाली तर दुखापतग्रस्त होण्याची भिती नेहमीच कमी असते.

१४ ऑक्टोबरला रंगणार भारत- पाकिस्तान सामना..

आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत- पाकिस्तान सामना हा हाय वॉल्टेज सामना असणार आहे. हा सामना यापूर्वी १५ ऑक्टोबरला खेळवला जाणार होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव वनडे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता बदललेल्या वेळापत्रकानूसार हा सामना १४ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com