Rohit Sharma News: भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी रोहित शर्मावर वाहतूक पोलिसांची कारवाई! मोठं कारण आलं समोर

Rohit Sharma Fined By Pune Traffic Police: भारत- बांगलादेश सामन्यापूर्वी पुणे वाहतूक पोलिसांनी रोहित शर्मावर मोठी कारवाई केली आहे.
rohit sharma
rohit sharmatwitter
Published On: 

Rohit Sharma Fined By Pune Traffic Police:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धा सुरू असताना भारतीय कर्णधार रोहित शर्माबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय संघाचा वर्ल्डकप स्पर्धेतील पुढील सामना बांगलादेश संघाविरूद्ध रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ पुण्यात दाखल झाला आहे. दरम्यान या सामन्यासाठी पुण्याच्या दिशेने जात असताना गाडी पळवणं रोहित शर्माला महागात पडलं आहे.

भारतीय संघाचा पाकिस्तानविरूद्धचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला होता. या सामन्यानंतर रोहित शर्मा दोन दिवसांसाठी मुंबईत परतला होता. आता तो पुण्यात पोहोचला आहे. दरम्यान पुण्याला जात असताना त्याने लॅम्बोर्गिनी कार २०० पेक्षाही अधिकच्या स्पीडने पळवली.

झी न्यूजच्या वृ्त्तानूसार, रोहित शर्मा मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे मार्गे पुण्याला गेला. यादरम्यान त्याने आपली लॅम्बोर्गिनी कार २०० किमीपेक्षाही अधिकच्या गतीने पळवली. या मार्गावर ताशी १०० किमी वेगाची मर्यादा होती

मात्र हिटमॅनने ताशी २०० किमीपेक्षाही अधिकच्या गतीने कार पळवली. यादरम्यान पुणे वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. त्याने वाहतूकीचे नियम मोडले असून, त्याच्यावर दंड आकारण्यात आला आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

rohit sharma
IND vs BAN, Weather Report: भारत - बांगलादेश सामन्यात पाऊस ठरणार व्हिलन? हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

वेगाने गाडी चालवल्याने आणि वाहतूकीचे नियम मोडल्याने रोहितच्या नंबर प्लेटवर ऑनलाईन स्वरूपात दंड आकारण्यात आला आहे. या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की,काही ठिकाणी रोहितच्या कारची स्पीड २१५ च्या आस पास होती. वाहतूक विभागाच्या एका सुत्राने म्हटले की,' वर्ल्डकप सुरू असताना रोहितचं महामार्गावर गाडी चालवणं ठिक नाही, त्याने टीम बससोबत प्रवास करायला हवा. तसेच पोलिसांची गाडी सोबत असणं गरजेचं आहे,' (Latest sports updates)

rohit sharma
Paras Mhambrey Statement: '...म्हणून शमी आणि अश्विनला आम्ही संधी देत नाही.', IND vs BAN लढतीपूर्वी बॉलिंग कोचचा मोठा खुलासा

पुण्यात रंगणार सामना..

भारतीय संघाचा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील चौथा सामना पुण्यात रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. भारतीय संघाने सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर चौथा सामना जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com