Rohit Sharma: विराट पाठोपाठ रोहितही बनला 'अलिबागकर', खरेदी केली इतक्या कोटींची जमीन

Rohit Sharma Buys Land In Alibag: भारताचा कर्णधार रोहित शर्मा अलिबागमध्ये स्पॉट झाल्याचे पाहायला मिळाले होते.
Rohit Sharma
Rohit Sharma Buys Land In Alibagyandex
Published On

Rohit Sharma News In Marathi: येत्या २२ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये रंगणार आहे. भारतीय संघातील खेळाडू या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत.

मात्र रोहित शर्मा भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाताना दिसून आला नाही. तो अलिबागमध्ये आपल्या पत्नीसोबत दिसून आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी कसोटी मालिका ही भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठायची असेल, तर ही मालिका कुठल्याही परिस्थितीत जिंकावी लागणार आहे. मात्र कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नसणार असल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले, त्यावेळी रोहित शर्मा अलिबागमध्ये दिसून आला आहे.

Rohit Sharma
IND vs AUS: विराट की रोहित; ऑस्ट्रेलियात कोणाची बॅट तळपते? वाचा BGT मध्ये कसा राहिलाय दोघांचा रेकॉर्ड

रोहित बनला अलिबागकर

रोहित शर्मा आपल्या पत्नीसह अलिबागमध्ये दिसून आला आहे. त्याने अलिबागमध्ये एकीकडे १५ तर दुसरीकडे ७० गुंठे इतकी जमीन खरेदी केली आहे. त्याचे काही फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Rohit Sharma
IND vs AUS: खरंच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात 4-1 ने हरवणं शक्य आहे का? BGT मध्ये कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

पत्नीच्या नावावर खरेद केली जमीन

रोहितने आपल्या पत्नीच्या नावावर जमीन खरेदी केली आहे. रोहितने म्हात्रोलीत १५ गुंठे जमीन खरेदी करण्यासाठी ४० लाख २० हजार रुपये तर सारळमध्ये ७१ गुंठे जमीन खरेदी करण्यासाठी ८ लाख ६२ हजार रुपयांची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे. असा उल्लेख खरेदीखतात करण्यात आला आहे.

अलिबागमध्ये जमीन खरेदी करणारा रोहित हा पहिला क्रिकेटपटू नाही. यापूर्वी देखील विराट कोहली, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, रवि शास्त्री यांसारख्या स्टार खेळाडूंनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. काही महिन्यांपूर्वीच विराटने अलिबागमध्ये अलिशान घर बांधलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com