Simranjit Singh: मोठी बातमी! स्टार खेळाडूची मृत्यूशी झुंज; ICUमध्ये केलं भरती

Ireland Cricketer Admitted In Hospital: भारतीय मुळचा आयर्लंडचा क्रिकेटपटू सिमरनजीत सिंगची प्रकृती खालावली आहे.
Simranjeet Singh:  मोठी बातमी! स्टार खेळाडूची मृत्यूशी झुंज; ICUमध्ये केलं भरती
simranjit singh
Published On

क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय मुळचा आयर्लंडचा खेळाडू मृत्यूशी झुंज देतोय. सध्या या क्रिकेटपटूवर गुरुग्राममधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या क्रिकेटपटूचं नाव सिमरनजीत सिंग असं आहे. आयर्लंड संघाकडून खेळणारा सिमरनजीत सिंग ICU मध्ये भरती आहे.

Simranjeet Singh:  मोठी बातमी! स्टार खेळाडूची मृत्यूशी झुंज; ICUमध्ये केलं भरती
Team India News: टीम इंडियात संधी मिळेना! शिखर धवननंतर हे ३ भारतीय खेळाडूही घेऊ शकतात निवृत्ती

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सिमरनजीत सिंगच्या सासऱ्यांनी त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. ते म्हणाले की, ५-६ महिन्यांपूर्वी जेव्हा सिमी (सिमरनजीत सिंग) डब्लिनमध्ये होता त्यावेळी त्याला ताप आला होता. हा ताप येत जात होता. ज्यावेळी त्याने आयर्लंडमध्ये डॉक्टरांना दाखवलं, त्यावेळी फार काही असं कळून आलं नाही. त्यामुळे औषधंही सुरु नव्हती. हेच कारण होतं की, त्याच्यावर उपचार करण्यात उशीर झाला. त्यामुळेच त्याच्यावर उपचार घेण्यासाठी आम्ही भारतात आलो.'

Simranjeet Singh:  मोठी बातमी! स्टार खेळाडूची मृत्यूशी झुंज; ICUमध्ये केलं भरती
Paris Paralympics 2024: सिंग इज किंग! Harvinder Singh ने गोल्डवर निशाणा साधत रचला इतिहास

भारतात आल्यानंतर मोहालीत त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र तिथेही उपचारादरम्यान फार काही फरक जाणवला नाही. एका रुग्णालयात आम्हाला सांगण्यात आलं की, त्याला टीबीचा त्रास आहे. शेवटी आम्ही त्याचे उपचार गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला.

सिमरनजीत सिंगचा पंजाबमध्ये झाला. त्याने भारतातूनच आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने अंडर-१४ आणि अंडर-१७ लेव्हलला पंजाब संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र त्याला अंडर -१९ क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर २००५ मध्ये हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी तो आयर्लंडला गेला. तिथे गेल्यानंतर त्याची पुढील कारकिर्द सुरु झाली.

सिमरनजीत सिंगच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, त्याला आयर्लंड संघासाठी ३५ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान फलंदाजीत त्याने ५९३ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना ३९ गडी बाद केले. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ५३ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २९२ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना ४४ गडी बाद केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com