Ind Vs Zim: टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा 'आऊट'; संघात बदल, ऑलराउंडरला मिळाली संधी

भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघात बदल करण्यात आला आहे.
India vs Zimbabwe 2nd ODI Shardul Thakur Deepak Chahar
India vs Zimbabwe 2nd ODI Shardul Thakur Deepak ChaharSAAM TV
Published On

Ind Vs Zim 2nd ODI | मुंबई: भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज होत आहे. टीम इंडियाचा कर्णधार के. एल. राहुल याने सलग दुसऱ्या सामन्यात टॉस जिंकला आहे. त्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. दुसरीकडे संघात मोठा बदल झाला आहे. पहिल्या वनडेत चॅम्पियन ठरलेला खेळाडू जायबंदी झाल्यानं पुन्हा संघाबाहेर गेला आहे. त्याच्या जागी ऑलराउंडर खेळाडूला संधी मिळाली आहे.

India vs Zimbabwe 2nd ODI Shardul Thakur Deepak Chahar
Virat Kohli : एकही शतक नाही, १००० दिवस पूर्ण, 'रन मशीन' विराट कोहली झाला ट्रोल

टीम इंडियाने (Team India) पहिला वनडे सामना जिंकून झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. झिम्बाब्वे या सामन्यात पराभूत झाला तर मालिकाही गमावेल. तर भारतानं हा सामना जिंकला तर, मालिकाही जिंकेल. भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध (Ind Vs Zim) सलग १३ सामने जिंकले आहेत.

India vs Zimbabwe 2nd ODI Shardul Thakur Deepak Chahar
Sports: "तेव्हा मी पॅव्हेलियनमध्ये जाऊन रडलो होतो"; पुण्यातल्या ग्राऊंडमध्ये सचिननं दिला आठवणींना उजाळा

मात्र, मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणाऱ्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. जलदगती गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) हा बऱ्याच काळानंतर संघात परतला होता. त्याने पहिल्या वनडेत २७ धावा देत तीन विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात तो सामनावीर ठरला होता. मात्र, दुसऱ्या वनडेत तो खेळणार नाही. तो जायबंदी झाला आहे. त्याच्या जागी ऑलराउंडर शार्दुल ठाकूरला संधी मिळाली आहे. (Cricket News Update)

टॉस जिंकल्यानंतर कर्णधार के. एल. राहुल याने दीपक चाहरला संघाबाहेर ठेवण्याचे कारण स्पष्ट केलेले नाही. बीसीसीआय किंवा टीम व्यवस्थापनच याबाबत अधिकृत माहिती देऊ शकतं. दुसरीकडे माजी क्रिकेटपटू आरपी सिंह याने सांगितले की, चाहरला विश्रांती देण्यात आली आहे.

दरम्यान, २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या टी-२० आशिया कप स्पर्धेतही दीपक चाहरला स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. यावेळी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी चाहर हा संघात असणे महत्वाचे आहे.

३० वर्षीय जलदगती गोलंदाज दीपक चाहर हा जायबंदी असल्याने आयपीएल २०२२ मध्ये खेळू शकला नव्हता. चेन्नई सुपरकिंग्जने त्याला १४ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याने आतापर्यंत ८ वनडे सामने खेळले आहेत, त्यात त्याने १३ विकेट घेतल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com