Virat Kohli : एकही शतक नाही, १००० दिवस पूर्ण, 'रन मशीन' विराट कोहली झाला ट्रोल

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली शतकी खेळी करण्यासाठी संघर्ष करत आहे.
Virat Kohli
Virat Kohlisaam Tv
Published On

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली शतकी खेळी करण्यासाठी अनेक दिवसांपासून संघर्ष करत आहे. विराट कोहलीने (virat kohli) एक हजार दिवस झाले तरी एकही शतक ठोकलं नाही. कोहलीने २०१९ मध्ये बांग्लादेशच्या विरुद्ध शेवटचं शतक केलं होतं. त्यामुळे रनमशीन विराट कोहली पुन्हा एकदा नव्या जोशात धावांचा पाऊस पाडण्यासाठी आशिया कपमध्ये ( Asia cup tournament ) काय कमाल करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आशिया कप २७ ऑगस्टपासून सुरू होणार असून ११ सप्टेंबरला संपणार आहे.

Virat Kohli
India vs Zimbabwe ODI : राहुल त्रिपाठीला मिळणार पदार्पणाची संधी! अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडियाचा स्टार बल्लेबाज विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकी खेळी करून १ हजार दिवस झाले आहेत. विराटने (virat kohli centuries) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ नोव्हेंबर २०१९ ला शेवटचं शतक ठोकलं होतं. त्यावेळी विराटने बांग्लादेशच्या विरोधात कोलकाता मध्ये टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी १३६ धावा कुटल्या होत्या. हा आंतराष्ट्रीय स्तरावर विराटचा ७० वा शतक होता. दरम्यान, कोहलीच्या या खराब कामगिरीवर इंग्लंडच्या बार्मी आर्मीने विराट कोहलीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

बार्मी आर्मीने 1000 दिन असं ट्विट करत विराटला ट्रोल केलं आहे. परंतु, बार्मी आर्मीला ही ट्रोलिंग महागात पडली आहे. भारतीय चाहत्यांनी त्यांच्या या ट्रोलिंगला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. एका चाहत्याने लिहिलं, ३५३२ दिवसांपासून इंग्लंडने भारताच्या विरुद्ध त्यांच्या घरेलू मैदानावर एकही मालिका जिंकली नाही. तर दुसऱ्याने म्हटलं, इंग्लंडच्या एकाही फलंदाजाचे वनडे क्रिकेटमध्ये विक्रमी आकडे नाही आहेत.

Virat Kohli
Indian Cricket Team : झिम्बाब्वे 'हरा'रे ! शिखर-शुभमनच्या चौफेर फटकेबाजीमुळं भारताचा मोठा विजय

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतक

सचिन तेंडुलकर - ६६४ सामने, ३४३५७ धावा, १०० शतक

रिकी पॉन्टिंग - ५६० सामने, २७४८३ धावा, ७१ शतक

विराट कोहली - ४६३ सामने, २३७२६ धावा, ७० शतक

कुमार संगकारा- ५९४ सामने, २८०१६ धावा, ६३ शतक

जॅक्स कॅलिस- ५१९ सामने, २५५३४ धावा, ६२ शतक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com