नवी दिल्ली : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु झाली असून पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने (Indian Cricket Team) मोठा विजय मिळवला आहे. झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. भारताचे सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शुभमन गिलने (Shubman Gill) झिम्बावेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. शिखरने नाबाद ८१ तर शुभमनने ८२ धावांची धडाकेबाज खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.
झिम्बाब्वेने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाला टीम इंडियाने सहज पार केलं असून १० विकेट्सने सामना एकतर्फी जिंकला. भारताचे वेगवान गोलंदाजांनी भेदक कामगिरी करुन मैदानात विजयाचा गुळाल उधळला. प्रसिद्ध कृष्णा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. झिम्बाब्वेने भारताला १९० धावांचं टार्गेट दिल होतं. त्यानंतर भारताचे आक्रमक फलंदाज शिखर धवन आणि शुभमन गिल मैदानात उतरले आणि धावांचा पाऊस पाडला.
शिखरने चौफेर फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली. तर शुभमननेही शिखरला साथ देत ८२ धावा कुटल्या. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या झिम्बावेने ४० षटके आणि ३ चेंडूत सर्वबाद १८९ धावा केल्या. १९० धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने या सामन्यात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर तुफान फटकेबाजी करत १९० धावांचं लक्ष्य बिनबाद होऊन गाठलं. शिखर आणि शुभमनच्या आक्रमक खेळीमुळं भारताला झिम्बाब्वेवर सहज मात करता आली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.