India vs Zimbabwe ODI : राहुल त्रिपाठीला मिळणार पदार्पणाची संधी! अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे.
India vs Zimbabwe ODI
India vs Zimbabwe ODISaam Tv
Published On

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट (Indian Team) संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना आज (१८ ऑगस्ट) होणार आहे. हरारे येथे होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १२.४५ वाजता सुरू झाला आहे.

भारत आणि झिम्बाब्वेचे संघ ६ वर्षांनंतर आमनेसामने येणार आहेत. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २२ जून २०१६ रोजी झाला होता. त्यानंतर भारताने हरारे टी-20 सामना ३ धावांनी जिंकला.

India vs Zimbabwe ODI
Ind Vs Zim: पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी केएल राहुलने BCCI चे केले कौतुक: काय आहे कारण?

मालिकेतील या पहिल्या वनडे सामन्यासाठी भारतीय कर्णधार केएल राहुल त्याच्या प्लेइंग-११ मध्ये राहुल त्रिपाठीला संधी देऊ शकतो. तसे झाल्यास राहुल त्रिपाठीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाचा पहिलाच सामना असेल. राहुल त्रिपाठीला संधी देण्यासाठी ऋतुराज गायकवाड याला बाहेर बसावे लागणार आहे.

शुभमन गिल सलामीला शिखर धवनसोबत सुरुवातीला मैदानात येऊ शकतो. कर्णधार राहुल स्वतः चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. तर इशान किशन किंवा संजू सॅमसन यापैकी एकाला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि आवेश खान कमांड सांभाळताना दिसणार आहेत. दीपक चहर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही संधी मिळू शकते.

India vs Zimbabwe ODI
Team India FTP 2023 : 'असा' आहे टीम इंडियाचा पुढील पाच वर्षांचा शेड्युल, वाचा सविस्तर माहिती

शिखर धवन, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड/राहुल त्रिपाठी, केएल राहुल (कर्णधार), संजू सॅमसन/इशान किशन (विकेटकीपर), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर/दीपक चहर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा/आवेश खान.

मालिकेसाठी दोन्ही देशांची टीम

भारतीय संघ (Indian Team) : केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

झिम्बाब्वे संघ: रायन बुर्ले, रेगिस चकाबवा (क), तनाका चिवांगा, ब्रॅडली इव्हान्स, ल्यूक जोंगवे, इनोसंट काया, ताकुडझ्वानाशे कैटानो, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमनी, जॉन मसारा, टोनी मुन्योंगा, विनयगर, टोनी मुन्योंगर, सिवांगर, रिसॉ. मिल्टन शुम्बा, डोनाल्ड टिरिपानो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com