मुंबई: मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा भारतासाठी खेळलेला महान फलंदाज म्हणून ओळखला जातो. सचिनला निरोप देताना भावूक झाल्याचे पाहून चाहत्यांनाही त्याच्या निवृत्तीवर अश्रू आवरणं शक्य झालं नाही. सचिनही भावूक झाल्याने त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे दुर्मिळ दृश्य होते. मात्र, सचिन तेंडुलकरने नुकताच आणखी एक प्रसंग उघड केला जेव्हा त्याला अश्रू अनावर झाले. त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, त्याने मुंबईसाठी त्याच्या वयाच्या 15 वर्षांखालील क्रिकेटच्या दिवसातील आठवणी शेअर केल्या, जेव्हा तो पॅव्हेलियनमध्ये रडला होता. (Sachin Tendulkar Latest News)
हे देखील पाहा -
सचिननं ट्विटरवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्याला "पुण्यातील PYC जिमखाना येथे भावनिक क्षण" असं सचिनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, "सध्या, मी पुण्याच्या (Pune) PYC क्लबमध्ये आहे जिथे मी 1986 च्या सुमारास मुंबईसाठी माझा पहिला 15 वर्षांखालील क्रिकेट सामना खेळला होता. मी इथे माझ्या फलंदाजीच्या वेळी नॉन-स्ट्रायकर्सच्या टोकाला उभा होतो आणि माझा शालेय मित्र राहुल गणपुले, स्ट्रायकर्सच्या टोकावर होता. तो (राहुल) विकेट्सच्या दरम्यान खूप वेगवान धावपटू होता," अशी आठवण सचिनने सांगितली.
सचिनने पुढे सांगितलं की, मुंबई अंडर-15 संघाचे व्यवस्थापक अब्दुल इस्माईल, तसेच मिलिंद रेगे आणि वासू परांजपे या वरिष्ठ क्रिकेटपटूंनी त्याचे सांत्वन केले आणि आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले होते. शेवटी सचिन म्हणाला की, "मी जवळपास 35 वर्षांनंतर या मैदानावर आलो आहे. त्यामुळे मी सध्या थोडा भावूक झालो आहे".
मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर हा भारतासाठी खेळलेला महान फलंदाज म्हणून ओळखला जातो. 24 वर्षांच्या कारकिर्दीत, सचिनने भारतासाठी 200 कसोटी आणि 463 एकदिवसीय सामने खेळले. त्याने जागतिक कसोटीमध्ये 15921 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 18426 विक्रमी धावा केल्या. तसेच कसोटीमध्ये 51 शतके आणि वनडेमध्ये 49 शतके केली.
ODI क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा पहिला खेळाडू, 100 आंतरराष्ट्रीय शतके करणारा पहिला फलंदाज, ODI मध्ये दुहेरी शतक झळकावणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू, दोन्ही फॉर्मेटमध्ये खेळले गेलेले सर्वाधिक सामने इतर टप्पे पार करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.