कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे. या गेल्या दोन सामन्यांप्रमाणे या सामन्यातही नाणेफेकीत श्रीलंकेने बाजी मारली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५० षटकअखेर २४८ धावा केल्या आहेत. यासह भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४९ धावांची गरज आहे.
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत दोन्ही सलामीवीरांनी शानदार सुरुवात करुन दिली. पथुम निसंकाने ४५ धावांची खेळी केली. तर अविष्का फर्नांडोने ९६ धावा चोपल्या. दोघांनी मिळून ८९ धावा चोपल्या. तर कुसल मेंडीसने ८२ चेंडूंचा सामना करत ५९ धावा चोपल्या. शेवटी कमिंदू मेंडीसने नाबाद २३ धावा करत श्रीलंकेचा डाव ७ गडी बाद २४८ धावा केल्या. यासह भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४९ धावांची गरज आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला. अर्शदीप सिंगला प्लेइंग ११ मधून बाहेर करत रियान परागला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. त्याने ९ षटक गोलंदाजी करत ५४ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याने ३ महत्वपूर्ण गडी बाद केले. यासह मोहम्मद सिराज, अक्षर पटेल,वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १ गडी बाद केला.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रियान पराग, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
अविष्का फर्नांडो, पथुम निसंका, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका (कर्णधार), जनिथ लियानागे, कामिंदु मेंडिस, डुनिथ वेलालगे, महीश तीक्ष्णा, जेफरी वेंडरसे, असिथा फर्नांडो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.