Ind Vs SL : पुण्यात टीम इंडिया का हरली?; ५ मुद्द्यांमधून समजून घ्या पराभवाची गोष्ट

India Vs Sri Lanka 2nd T20 In Pune : टीम इंडियाच्या पराभवाची ५ कारणे देता येतील. ती समजून घेऊयात.
India Vs Sri Lanka 2nd t 20 in Pune/Twitter/BCCI
India Vs Sri Lanka 2nd t 20 in Pune/Twitter/BCCISAAM TV
Published On: 

India Vs Sri Lanka 2nd T20 In Pune : कर्णधार दासुन शनाका आणि कुसल मेंडिसचं तुफानी अर्धशतक आणि गोलंदाजांचा तिखट मारा या जोरावर श्रीलंकेनं भारताला पुण्यात झालेल्या टी २० सामन्यात पराभूत केलं.

श्रीलंकेनं गुरुवारी पुण्यात झालेल्या सामन्यात भारताला १६ धावांनी पराभूत करून तीन सामन्यांच्या टी २० मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. श्रीलंकेनं भारतासमोर धावांचा डोंगर उभारला होता. भारताला २०७ धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला १९० धावाच करता आल्या.

India Vs Sri Lanka 2nd t 20 in Pune/Twitter/BCCI
IND vs SL 2nd T20 : 'ते' ७ चेंडू ठरले टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत; श्रीलंकेचा २०१६ नंतर पहिल्यांदाच भारतभूमीत विजय

भारताकडून ऑलराउंडर अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी अर्धशतके ठोकली. या दोघांव्यतिरिक्त शिवम मावी यानं १५ चेंडूंत २६ धावा कुटल्या. पण या तिघांची झुंज अपयशी ठरली.

भारताला पहिल्या टी २० लढतीत विजयासाठी मोठी धडपड करावी लागली होती. श्रीलंकेला केवळ २ धावांनी पराभूत केलं होतं. पण पुण्यात त्यांनी पराभवाचा वचपा काढलाच. श्रीलंकेनं या सामन्यात भारतीय संघावरील दबाव शेवटपर्यंत ठेवला आणि अखेरच्या षटकापर्यंत पोहोचलेल्या सामन्यात विजय मिळवला. टीम इंडियाच्या पराभवाची ५ कारणे देता येतील. ती समजून घेऊयात.

नाणेफेकीनंतर घेतला चुकीचा निर्णय

हार्दिक पंड्यानं नाणेफेक जिंकू प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण या मैदानावर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला विजयाची खूपच कमी संधी मिळाली आहे. नेहमीच या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला आहे. हार्दिकला याबाबत प्रश्न विचारला असता, आकडेवारीबाबत मला काही माहीत नाही, असं उत्तर दिलं.

भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी

भारतीय संघासमोर २०७ धावांचं लक्ष्य होतं. फलंदाजांनी मैदानावर उतरताच आक्रमक सुरुवात केली. पण या नादात विकेट गमावल्या. इशान किशन २ धावा, शुभमन गिल ५ धावा आणि राहुल त्रिपाठीनं अवघ्या ५ धावा केल्या. अवघ्या २. १ षटकातच भारताचे आपले तीन आघाडीचे फलंदाज गमावले. त्यामुळं नंतरच्या फलंदाजांवर दबाव आला.

India Vs Sri Lanka 2nd t 20 in Pune/Twitter/BCCI
Ind Vs SL : नो बॉलची हॅट्ट्रिक, एका चेंडूवर १४ धावा; अर्शदीपच्या नावे सर्वात खराब विक्रम

भारताची खराब गोलंदाजी

भारतीय गोलंदाजांनी पुण्याच्या मैदानावर अत्यंत खराब कामगिरी केली. सर्व गोलंदाजांनी धावांची खैरात वाटली. पॉवरप्लेमध्ये श्रीलंकेने ५५ धावा केल्या होत्या. पहिल्या विकेटसाठी पाथुम निसंका आणि कुसल मेंडिस या दोघांनी ८० धावांची भागीदारी रचली होती. शिवम वामी याने ५३ धावा, उमरान मलिकने ४८ धावा आणि अर्शदीपने अवघ्या २ षटकांत ३७ धावा दिल्या.

नो बॉलची डोकेदुखी

भारताची गोलंदाजी भरकटलेली दिसली. टीम इंडियाकडून या सामन्यात एकूण ७ नो बॉल फेकले गेले. एकट्या अर्शदीपने ५ नो बॉल फेकले. तर उमरान मलिकनेही नो बॉल फेकला. त्यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांना फायदा उठवता आला. त्यांनी फ्री हिटवर खोऱ्यानं धावा ओढल्या. अतिरिक्त ७ चेंडूंवर ३० धावा केल्या.

शनाकाची तुफानी फलंदाजी

भारतीय संघानं मधल्या षटकांमध्ये पुनरागमन केलं. पण श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याला रोखण्यात त्यांना अपयश आलं. शनाकाने २२ चेंडूंत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ५६ धावा कुटल्या. त्या जोरावर श्रीलंकेला २०६ धावांचा डोंगर उभारता आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.