IND W vs PAK W: अग बया! चेंडू खेळला पण क्रीझमध्ये बॅट ठेवायची विसरली अन्...; पाकिस्तानची कर्णधार पंचांना थेट भिडली

Women’s World Cup 2025: वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होतोय. या सामन्यात भारताला मुनीबा अली सिद्दकीच्या रुपाने पहिलं यश मिळालं.
Women’s World Cup 2025
India celebrates Muneeba Ali’s wicket as Pakistan captain argues with umpire in Women’s World Cup clash.saam tv
Published On
Summary
  • महिला वर्ल्डकपमध्ये सहावा सामना भारत-पाकिस्तान मध्ये होतोय.

  • पाकिस्तानला पहिला धक्का मुनीबा अलीच्या रुपाने मिळाला.

  • मुनीबा अलीच्या बाद होण्यावरून वाद.

आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा सहावा सामना भारत आणि पाकिस्तानच्या संघात होत आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना षटकात सर्व गडी गमवून 50 षटकात 247 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने सावध सुरुवात केली.

पण पाकिस्तानला पहिला धक्का मुनीबा अली सिद्दकीच्या रुपाने बसला. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला पहिला धक्का मिळाला. मात्र तिच्या मुनीबा अली सिद्दकीच्या आऊट होण्यावरून मात्र मैदानात चांगलाच राडा झाला. पंचांनी तिला बाद ठरवल्यानंतर पाकिस्तान कर्णधार थेट पंचाला भिडली.

Women’s World Cup 2025
IND Vs PAK सामना 'या' हल्ल्यामुळे थांबला, स्टेडियम धुराने भरले; पाहा नेमकं काय घडलं? VIDEO

त्याच झालं असं, भारतीय संघाची गोलंदाज क्रांती गौड षटक टाकत होती. तिने टाकलेला एक चेंडू मुनीबाच्या पॅडला लागला. यासाठी क्रांतीने जोरदार अपील केली. पण पंचांनी नाबाद दिलं. पण याच दरम्यान मुनीबा अलीने क्रीझ सोडलं होतं. ही संधी हेरत दीप्ती शर्माने स्टंपवर थ्रो केला. यावेळी मुनीबाने बॅट वर उचलली होती आणि तेव्हाच चेंडू स्टंपवर आदळला. तसेच शरीरही क्रीझबाहेर होते. म्हणून पंचांनी तिला बाद दिलं.

Women’s World Cup 2025
IND Vs PAK मध्ये राडा! डोळे वटारुन पाहिले, खुन्नस दिली; भारताची कर्णधार पाकिस्तानी खेळाडूला भिडली

विचित्र पद्धतीने धावचीत दिल्याने पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना संतापली. या विकेटनंतर फातिमा सनाने थेट पंचांना धारेवर धरलं. तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यानंतर काही काळ पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना आणि पंचांमध्ये वाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com