Asia Cup 2023: भारत - पाकिस्तान सामना होणार रद्द? समोर आलं चिंता वाढवणारं कारण

India vs Pakistan Weather Report: या सामन्यापूर्वी क्रिकेट फॅन्सची चिंता वाढवणारं कारण समोर आलं आहे.
rohit sharma with babar azam
rohit sharma with babar azam saam tv
Published On: 

India vs Pakistan Asia Cup 2023 Weather Report:

आशिया चषक सुरू व्हायला अवघे काही दिवस राहिले आहेत. या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंकेत केले जाणार आहे. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरीदेखील हायब्रिड मॉडेलनूसार या स्पर्धेतील भारतीय संघाचे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहे.

या स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत तर ४ सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहे. बहुप्रतिक्षीत भारत- पाकिस्तान सामना २ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

rohit sharma with babar azam
IND vs IRE 1st T20I: भारताचे गोलंदाज पुन्हा ठरले सरस; आयर्लंडचं टीम इंडियासमोर विजयासाठी १४० धावांचं लक्ष्य

यावर्षी भारतात वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक स्पर्धा ही अतिशय असणार आहे. ठरलेल्या वेळापत्रकानूसार भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबर रोजी रंगणार आहे.

हा सामना श्रीलंकेतील कँडी शहरात रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. Accuweather च्या रिपोर्टनूसार भारत- पाकिस्तान सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ४० टक्के इतकी असणार आहे. तर सामन्याच्या एक दिवसापूर्वी पाऊस पडण्याची शक्यता ५१ टक्के इतकी असणार आहे.

या ६ संघांमध्ये रंगणार आशिया चषक स्पर्धेचा थरार..

यावेळी वर्ल्डकप स्पर्धा पाहता आशिया चषक स्पर्धेचे आयोजन वनडे फॉरमॅटमध्ये केले जाणार आहे. साखळी फेरीतील सामने, सुपर ४ आणि अंतिम सामना असे मिळून या स्पर्धेत एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत भारतीय संघासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या संघांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेतील सामन्यांची विभागणी २ गटात करण्यात आली आहे. पहिल्या गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ हे दोन्ही संघ असणार आहेत. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे तिन संघ असणार आहेत. (Latest sports updates)

rohit sharma with babar azam
Jasprit Bumrah Statement: 'जेव्हा कॅप्टन बनतो तेव्हा वैयक्तिक कामगिरीपेक्षा..', विजयानंतर बुमराहचे मन जिंकणारे वक्तव्य

आगामी आशिया चषक २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक...

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - ३० ऑगस्ट

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - ३१ ऑगस्ट

भारत विरुद्ध पाकिस्तान - २ सप्टेंबर

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - ३ सप्टेंबर

भारत विरुद्ध नेपाळ - ४ सप्टेंबर

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - ५ सप्टेंबर

सुपर-२४ सामने

अ १ विरुद्ध ब २ - ६ सप्टेंबर

ब १ विरुद्ध ब २ - ९ सप्टेंबर

अ १ विरुद्ध अ २ - १० सप्टेंबर

अ २ विरुद्ध ब १- १२ सप्टेंबर

अ १ विरुद्ध ब १ - १४ सप्टेंबर

अ २ विरुद्ध ब २ - १५ सप्टेंबर

अंतिम सामना - १७ सप्टेंबर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.