Jasprit Bumrah Statement: 'जेव्हा कॅप्टन बनतो तेव्हा वैयक्तिक कामगिरीपेक्षा..', विजयानंतर बुमराहचे मन जिंकणारे वक्तव्य

India vs Ireland 1st T20I: मैदानावर कमबॅक केल्यानंतर त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.
jasprit bumrah
jasprit bumrah twitter
Published On: 

India vs Ireland News In Marathi:

भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना डब्लिनमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईसनुसार २ धावांनी विजय मिळवला.

या मालिकेसाठी जसप्रीत बुमराहची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान बऱ्याच दिवसांनी मैदानावर कमबॅक केल्यानंतर त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

jasprit bumrah
IND vs IRE 1st T20I: आयर्लंडच्या विरोधात जसप्रीत बुमराहचं जोरदार कमबॅक, टीम इंडियाची विजयी सुरुवात

भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने सामना झाल्यानंतर कमबॅकबद्दल बोलताना म्हटले की, ' खूप चांगलं वाटत होतं. मी NCA मध्ये इतके सेशन केले आहेत की, मला वाटलच नाही की मी काही मिस करतोय. स्टाफला श्रेय द्यावं लागेल त्यांनी माझी खूप काळजी घेतली. थोडा नर्व्हस आहे पण खुश आहे. '

तसेच तो पुढे म्हणाला की, ' खेळपट्टीवर स्विंग होत होता. त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा घ्यायचा होता. नशिबाने आम्ही नाणेफेक जिंकलो त्यामुळे आम्हाला वातावरणाची देखील साथ मिळाली. प्रत्येक सामन्यात आपण आणखी चांगलं करण्याच्या प्रयत्नात असतो. संघ जिंकल्यानंतरही सुधारणा करण्यासाठी खूप गोष्टी असतात. संघातील प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास उचांवलेला आहे. मला वाटतं की, आयपीएलमुळे देखील फायदा होतो. जेव्हा आपण संघाचे नेतृ्त्व करत असतो त्यावेळी आपण वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरीवर अधिक भर देतो. ' (Latest sports updates)

jasprit bumrah
IND vs IRE 1st T20I: आयर्लंडच्या विरोधात जसप्रीत बुमराहचं जोरदार कमबॅक, टीम इंडियाची विजयी सुरुवात

बुमराहचं दमदार कमबॅक..

जसप्रीत बुमराहने ११ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. पुनरागमन केल्यानंतर पहिल्याच सामन्यात त्याने दमदार कामगिरी केली आहे या कामगिरीच्या बळावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला आहे. त्याने ४ षटकात २४ धावा करत २ गडी बाद केले.

भारतीय संघाचा विजय..

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आयर्लंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना बॅरी मॅकार्थीने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली होती. तर कर्टिस कॅम्परने ३९ धावांचे योगदान दिले होते.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना रवी बिश्नोईने ४ षटकात २३ धावा खर्च करत २ गडी बाद केले तर कर्णधार जसप्रीत बुमराहने २४ धावा खर्च करत २ गडी बाद केले. आयर्लंडने २० षटकअखेर ७ गडी बाद १३९ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६.५ षटकअखेर २ गडी बाद ४७ धावा केल्या होत्या. हा सामना पावसामुळे पुर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानूसार भारतीय संघाने २ धावांनी विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com