India vs Pakistan: आज जिंकावंच लागेल! पाकिस्तानविरूद्ध 'या' चुका करणं टीम इंडियाला पडणार महागात

India vs Pakistan Women’s T20 World Cup : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमची सुरुवात काही फारशी चांगली झालेली नाही. अशातच आज वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे.
India vs Pakistan Women’s T20 World Cup
India vs Pakistan Women’s T20 World Cup saam tv
Published On

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमची सुरुवात काही फारशी चांगली झालेली नाही. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातमध्ये न्यूझीलंडच्या महिला टीमने भारतीय मुलींचा ५८ रन्सने पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाचा सेमीफायनलचा मार्ग खडतर झाला आहे. अशातच आता पुढचे सर्व सामने टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण आहेत. यामध्येच आज भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये महामुकाबला रंगणार आहे.

ग्रुप स्टेजच्या सामन्यांमध्ये भारताला विजय गरजेचा

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचं रन रेट चांगलं नाहीये. या स्पर्धेमध्ये टीम इंडियाला आता पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध खेळाच्या खराब कामगिरी केली. त्यामुळे आता टीमच्या खेळाडूंना कमी वेळात त्यांच्या कमकुवतपणावर काम करणं आवश्यक आहे. हे काम तितकं सोपं नसून आजचा सामना पाकिस्तानशी आहे. पाकिस्तानच्या टीमने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला आहे. त्यामुळे भारत विरूद्ध पाकिस्तान हा सामना चुरशीचा ठरणार आहे.

India vs Pakistan Women’s T20 World Cup
Women's T20 WC: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! लाजिरवाण्या पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं संकट ; पाहा Points Table

टीम इंडियाला कॉम्बिनेशन सुधारण्याची गरज

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला कॉम्बिनेशन सुधारण्याची गरज आहे. न्यूझीलंडविरुद्ध अरुंधती रेड्डीच्या रूपाने एक अधिक वेगवान गोलंदाज टीम इंडियाला मिळालीये. अरुंधतीचा टीममध्ये समावेश करायचा असेल तर भारताला फलंदाजीचा क्रम बदलावा लागला. यामुळे हरमनप्रीतला तिसऱ्या क्रमांकावर, जेमिमाह रॉड्रिग्जला चौथ्या क्रमांकावर आणि ऋचा घोषला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागणार आहे.

गेल्या सामन्यात तीन वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा भारताचा निर्णय योग्य ठरला नाही. पिच ओलसर नसल्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा सहज सामना केला. तीन वेगवान गोलंदाजांसह खेळताना भारताला डावखुरी स्पिनर राधा यादवला वगळावं लागलं. मात्र या सामन्यात तिची कमतरता दिसून आली.

भारत विरूद्ध पाकिस्तान हेड-टू-हेड

भारताचा पाकिस्तानविरुद्धच्या रेकॉर्डवर नजर टाकल्यास हा रेकॉर्ड उत्तम असल्याचं पहायला मिळतं. या दोन टीम्समध्ये खेळल्या गेलेल्या 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी भारताने 12 सामने जिंकलेत. मात्र तरीही भारत पाकिस्तानला हलक्यात घेण्याची चूक करू नये.

India vs Pakistan Women’s T20 World Cup
IND vs BAN: मयांकसह या खेळाडूंना मिळणार पदार्पणाची संधी; सूर्यकुमार यादव कोणाला बसवणार?

वर्ल्डकपसाठी कशी आहे टीम इंडिया?

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया , पूजा वस्त्राकर, अरुंधति रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा सोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com