India vs Pakistan Record: भारत-पाकिस्तानचा हेड टू हेड रेकॉर्ड! बघा कोणाचं पारडं दिसतंय जड

India vs Pakistan News In Marathi: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ येत्या २ सप्टेंबर रोजी आमने सामने येणार आहेत.
rohit sharma with babar azam
rohit sharma with babar azamsaam tv
Published On: 

India vs Pakistan Head To Head Record In ODI Cricket:

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आशिया चषकासाठी सज्ज झाला आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे. हा सामना २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडीमध्ये रंगणार आहे.

हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पहायला मिळत असतो.

यावेळी देखील असाच काहीसा सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कसा राहीला आहे दोन्ही संघांचा रेकॉर्ड.

rohit sharma with babar azam
Asia Cup 2023, Playing XI: पाकिस्तानला आव्हान देण्यासाठी नेपाळ सज्ज! दोन्ही संघ या मजबूत प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

पाहा आकडेवारी..

भारतीय संघाविरुद्ध खेळताना पाकिस्तानने ७३ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर भारतीय संघाला केवळ ५५ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर ४ सामन्यांचा निकाल लागू शकलेला नाही.

न्यूट्रल वेन्यूवर खेळताना पाकिस्तानने ४० सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघाला ३३ सामने जिंकण्यात यश आले आहे.

पाकिस्तानने मायदेशात खेळताना भारतीय संघाला १४ सामन्यांमध्ये हरवलं आहे. तर ११ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारताचा मायदेशातील रेकॉर्ड..

भारतात खेळतानाही पाकिस्तानचा दबदबा पाहायला मिळाला आहे. पाकिस्तानने भारतीय संघाला १९ सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे. तर केवळ ११ सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे.

ही आकडेवारी पाहिली तर पाकिस्तानचा संघ भारतीय संघापेक्षा वरचढ असल्याचे दिसून येते. मात्र वर्तमान भारतीय संघ पाकिस्तान संघाला तोडीस तोड उत्तर देऊ शकतो.

दोन्ही संघ मजबूत असल्याने सामना रोमांचक होऊ शकतो. मात्र सामन्यात कोण बाजी मारणार याचा निकाल २ सप्टेंबरला लागेल. (Latest sports updates)

rohit sharma with babar azam
Asia Cup 2023: धुमधडाक्यात होणार एशिया कपची सुरूवात, सोहळ्याला 'या' सेलिब्रिटींची मांदियाळी, जाणून घ्या कोण-कोण लावणार हजेरी

आशिया चषकासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर,ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा , संजू सॅमसन (राखीव).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com