नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पाकिस्तानच्या विरोधात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यास उतरलेली पाकिस्तानची टीम १४७ धावांवर गारद झाली. त्यामुळे भारतासाठी विजयासाठी १४८ धावांचे आव्हान आहे.
पाकिस्ताच्या टीमने पॉवरप्लेच्या आाधीच दोन गडी गमावले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने केवळ १० धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर फखर झमानही १० धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर हार्दिक पांड्याने पाकिस्तानला तिसरा धक्का देत इफ्तिखार अहमदला बाद केले. त्यानंतर हार्दिकने पाकिस्तानच्या खुशदिल शाहला देखील बाद केले. त्यानंतर पाकिस्तानच्या रिझवानने ४२ चेंडूमध्ये ४३ धावा केल्यानंतर तोही बाद झाला.
१६ षटकांअखेर पाकिस्तानची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात १११ धावा झाल्या होत्या. या सामन्यानत पाकिस्तानच्या फलंदाजांनी शेवटच्या पाच षटकात काहीसा संयमी खेळ दाखवला. १९ व्या षटाकात भुवनेश्वरची हॅट्रिक घेण्याची संधी हुकली. शाहनवाज दहानीने ६ चेंडूमध्ये १६ धावा कुटल्या. पाकिस्तान टीमने १९.५ षटकात १४७ धावा केल्या. त्यामुळे भारतापुढे विजयासाठी १४८ धावांचे आव्हान आहे.
या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघ 'काळी पट्टी' परिधान करून मैदानात उतरला आहे. पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे 1 हजारपेक्षा जास्त नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्यासाठी टीमने काळी पट्टी लावून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.