IND vs PAK : बाबर आझम आउट होताच नेटकऱ्यांनी विराट कोहलीच्या 'त्या' ट्विटची करून दिली आठवण

भारताविरुद्ध पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अपयशी ठरला. बाबर आझम केवळ 10 धावांवप बाद झाला.
INDvsPAK
INDvsPAK Saam TV
Published On

नवी दिल्ली: दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) यांच्यात T20 सामना सुरू आहे. सामन्यात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. T20 विश्वचषक 2021 मध्ये भारताविरुद्ध सर्वोत्तम खेळ दाखवणारा कर्णधार बाबर आझम यावेळी मात्र अपयशी ठरला. बाबर आझमला फक्त 10 धावा करता आल्या आणि डावाच्या तिसऱ्या षटकात तो बाद झाला.

टीम इंडियाचा (Team India) प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारने बाबर आझमला बाद केला. बाबर आझम शॉर्ट बॉलवर पुल शॉट मारायला गेला तेव्हा बॉल बॅटला कट होऊन त्याचा झेल अर्शदीप सिंगकडे गेला. त्याने आपल्या डावात फक्त 9 चेंडू खेळला, ज्यात त्याने 2 चौकार मारून 10 धावा केल्या.

INDvsPAK
Ind vs Pak T20 Asia Cup : पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध 'काळी पट्टी' लावून का खेळतोय, जाणून घ्या काय आहे कारण

नेटकऱ्यांनी बाबर आझमला केले ट्रोल

भारताविरुद्धच्या अपयशामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. चाहत्यांनी त्याला त्याच्या एका ट्विटची आठवण करून दिली, जे त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) केले होते.

विराट कोहली खराब फॉर्मशी झुंज देत असताना बाबर आझमने विराट कोहलीच्या समर्थनार्थ ट्विट केले होते आणि लिहिले होते की, ही वाईट वेळही निघून जाईल, तुम्ही मजबूत राहा. आता चाहत्यांनी बाबरला त्याच ट्विटची आठवण करून दिली आणि तुम्हीही मजबूत राहा असे म्हटले आहे.

INDvsPAK
IND vs PAK Asia Cup: पत्रकाराने विचारले 'टीम इंडिया पाकिस्तानमध्ये कधी येणार'; रोहित शर्माने दिले मजेशीर उत्तर

दरम्यान, बाबर आझमचा ड्रेसिंग रुममध्ये बसलेला फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो खूपच दुःखी दिसत आहे. नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. 'या सामन्याच्या पहिल्या अर्ध्या तासात बरेच काही घडले आहे, ऋषभ पंत संघाबाहेर आहे, रिव्ह्यू देखील घेतले जात आहेत आणि आता बाबर आझम बाहेर आहे, असंही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com