

भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. सध्या वनडे मालिका सुरू आहे. यातील अखेरचा सामना १५ नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने आधीच संघाची घोषणा केली आहे. मात्र, आता त्यात एक बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या माहितीनुसार, कुलदीप यादवला रिलीज करण्याचा निर्णय निवड समितीनं घेतला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज गुरनूर बरार याची कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यांत गुरनूर बरार यानं चांगली कामगिरी केलीय. त्याची दखल निवड समितीकडून घेतली गेल्याचं दिसतंय. त्याला कसोटी मालिकेत संधी देण्यात आली आहे. त्यानं तीन सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी मालिका खेळणार असल्यानं पाचव्या वनडे सामन्यात तो खेळू शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. पाचव्या वनडेत त्याच्या जागी अद्याप कोणत्याही खेळाडूची निवड जाहीर केली नाही. तर कुलदीप यादवला कसोटी संघातून रिलीज करण्यात आलं आहे. तो मायदेशात परतणार असून, देशांतर्गत क्रिकेट सामने खेळणार आहे.
बऱ्याच महिन्यांपासून टीम इंडियाच्या बाहेर असलेला ऋषभ पंत या पुनरागमन कधी करणार असा प्रश्न विचारला जात होता. आता याचं उत्तर मिळालंय. न्यूझीलंड कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधीच पंत तंदुरुस्त झाला होता. बीसीसीआयच्या माहितीनुसार, पंत हा वेलिंग्टनमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिकल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, साई सुदर्शन, आकाश दीप, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, गुरनूर बरार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.