मुंबई: दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी फलंदाज के. एल. राहुल (KL Rahul) याच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. रोहित शर्मा आणि विराट कोहली या सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. मात्र, जायबंदी असल्याने के.एल. राहुल हा या मालिकेत खेळू शकला नाही. आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटीआधी राहुलबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
के. एल. राहुलच्या अनुपस्थितीत रिषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टीम इंडिया (Team India) सध्या या मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. राहुल अद्याप एनसीएमध्ये आहे. आता राहुलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यातही तो खेळू शकणार नाही. तसेच एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतही खेळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, राहुल कधीपर्यंत मैदानात उतरू शकेल याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. राहुल काही दिवसांपूर्वीच एनसीएमध्ये पोहोचला आहे. तो पूर्णपणे फिट झालेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो खेळणार का, याबाबत सध्या तरी शंका आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा पहिला गट १६ जून रोजी इंग्लंडसाठी रवाना होईल. प्रशिक्षक राहुल द्रविड, रिषभ पंत, श्रेयस अय्यर याच्यासह दुसरा गटही २० जून रोजी इंग्लंडसाठी रवाना होईल. ते सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहेत.
मयांक अग्रवालला मिळू शकते संधी
निवड समिती राहुलच्या जागेवर दुसऱ्या खेळाडूला पाठवणार का, याबाबत काहीही सांगता येत नाही. यापूर्वीच १७ सदस्यीय संघाची घोषणा झालेली आहे. त्यात ३ सलामीवीर आहेत. राहुलच्या अनुपस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल हा सलामीला येऊ शकतो. दुसरीकडे मयांक अग्रवाल याला संघात स्थान दिले जावे, असा एक मतप्रवाह आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, शुभमन गिल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, के. एस. भारत, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.