IND vs ENG: भारत- इंग्लंडचे खेळाडू हिरव्या रंगाची पट्टी घालून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण

Green Armband On India And England Players Arm: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात खेळाडू दंडावर हिरव्या रंगाची पट्टी घालून मैदानात का उतरले?
IND vs ENG: भारत- इंग्लंडचे खेळाडू हिरव्या रंगाची पट्टी घालून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
rohit sharmatwitter
Published On

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघातील खेळाडू आपल्या दंडावर हिरव्या रंगाची पट्टी घालून मैदानात उतरले. दरम्यान खेळाडू हिरव्या रंगाची पट्टी घालून मैदानावर उतरण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.

IND vs ENG: भारत- इंग्लंडचे खेळाडू हिरव्या रंगाची पट्टी घालून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
IND vs ENG: तिसऱ्या वनडेसाठी टीममध्ये मोठ्या बदलांची शक्यता; रोहित घेणार कठीण निर्णय? पाहा संभाव्य प्लेईंग ११

बीसीसीआयने अवयव दान करण्याची नवी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला समर्थन करण्यासाठी भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडू हिरव्या रंगाची पट्टी बांधून मैदानात उतरले. बीसीसीआयने याबाबत माहिती देत म्हटले की, “दोन्ही संघातील खेळाडू अवयव दानाच्या महिलेला समर्थन करण्यासाठी दंडावर हिरव्या रंगाची पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत."

IND vs ENG: भारत- इंग्लंडचे खेळाडू हिरव्या रंगाची पट्टी घालून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
Shubman Gill Record: जे कोणालाच नाही जमलं ते गिलने करुन दाखवलं! हा मोठा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज

जय शहा काय म्हणाले?

जय शहा यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून ट्वीट करत लिहिले की, “ एक प्रतिज्ञा एक निर्णय कितीतरी लोकांचं जीव वाचवू शकतो. त्यामुळे एकत्र या आणि प्रतिज्ञा घ्या...“ बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. ज्यात भारतीय खेळाडू अवयव दानाचे महत्व सांगताना दिसून आले होते.

IND vs ENG: भारत- इंग्लंडचे खेळाडू हिरव्या रंगाची पट्टी घालून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
Virat Kohli & Sachin Tendulkar: विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरच्या नावाचे रेल्वे स्टेशन! सत्य काय?

भारतीय संघाने उभारला ३५६ धावा

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ३५६ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना शुभमन गिलने सर्वाधिक ११२ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने ७८ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ५२ धावा केल्या. केएल राहुलने शेवटी फलंदाजी करताना ४० धावा केल्या.

गिल- विराटची विक्रमी खेळी

या डावात फलंदाजी करताना गिलने सर्वात जलद २५०० धावा करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यासह त्याचं हे शतकही विक्रमी ठरलं आहे. गिलने अहमदाबादच्या मैदानावर खेळताना वनडे, टी-२० आणि कसोटी क्रिकेट खेळताना शतकी खेळी करणारा पहिलाच फलंदाज बनण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तर विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा कारनामा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com