चेन्नईतील कसोटीतील सुरुवातीचे २ सेशन सोडले, तर उर्वरीत सर्व सेशनमध्ये भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला १४९ धावा करता आल्या. दरम्यान दुसऱ्या डावात ८१ धावा करत भारतीय संघाने ३०८ धावांची आघाडी घेतली आहे.
पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा डाव अवघ्या १४९ धावांवर आटोपला. भारतीय संघाने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने पहिल्या डावात २२७ धावांची मोठी आघाडी घेतली.
दरम्यान दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाला सुरुवातीलाच २ मोठे धक्के बसले. यशस्वी जयस्वाल १०, तर रोहित शर्मा ५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर विराटने १७ धावा करत पॅव्हेलियनची वाट धरली. दरम्यानश शुभमन गिल ३३ तर रिषभ पंत १२ धावांवर नाबाद आहे. दुसऱ्या डावात भारतीय संघाने ३०८ धावांची आघाडी घेतली आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात बांगलादेश संघाचा पहिला डाव अवघ्या १४९ धावांवर आटोपला. बांगलादेशकडून फलंदाजी करताना शाकीब अल हसनने सर्वाधि ३२ धावांची खेळी केली. तर मेहदी हसन मिराजने २७ आणि लिटन दासने २२ धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४, तर मोहम्मद सिराज,आकाश दीप आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर आटोपला.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. दरम्यान भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना आर अश्विनने सर्वाधिक १०८ धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने ८६ धावा केल्या. सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या यशस्वी जयस्वालने ५६ धावा केल्या. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ३७६ धावांपर्यंत मजल मारली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.