Ind vs Aus 2nd Test: विराट ७, रोहित ३; भारताचा निम्मा संघ तंबूत; गुलाबी कसोटीत टीम इंडिया अडचणीत

India vs Australia 2nd Test Live Score: भारत आणि ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचे ५ फलंदाज तंबूत परतले आहेत.
Ind vs Aus 2nd Test: विराट ७, रोहित ३; भारताचा निम्मा संघ तंबूत; गुलाबी कसोटीत टीम इंडिया अडचणीत
team indiatwitter
Published On

IND vs AUS 2nd Test: अॅडलेडच्या मैदानावर बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना डे- नाईट कसोटी सामना आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र हा निर्णय भारतीय संघाला सार्थ ठरवता आलेला नाही. भारतीय संघाला एकापाठोपाठ एक ५ मोठे धक्के बसले आहेत.

पिंक बॉल कसोटीत रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने स्वत: सलामीला न जाता केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालला सलामीला जाण्याची संधी दिली.

मात्र स्टार्कने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर यशस्वी जयस्वालला पायजित करत माघारी धाडलं. जयस्वाल बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिलने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांनी मिळून ६९ धावांची भागीदारी केली. मात्र ही भागीदारी आणखी पुढे जाऊ शकली नाही. केएल राहुल ३७ धावा करत माघारी परतला.

Ind vs Aus 2nd Test: विराट ७, रोहित ३; भारताचा निम्मा संघ तंबूत; गुलाबी कसोटीत टीम इंडिया अडचणीत
IND vs AUS Record: पिंक बॉल कसोटीत कोण कोणावर भारी? कसा राहिलाय IND vs AUSचा रेकॉर्ड?

केएल राहुल बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला. गेल्या सामन्यात शतकी खेळी करणारा, विराट कोहली या सामन्यातही मोठी खेळी करेल, असं वाटलं होतं. मात्र तो अवघ्या ७ धावा करत माघारी परतला.

Ind vs Aus 2nd Test: विराट ७, रोहित ३; भारताचा निम्मा संघ तंबूत; गुलाबी कसोटीत टीम इंडिया अडचणीत
IND vs AUS: स्टार्कने बदला घेतला! वेगाने बॉल आला अन् पहिल्याच बॉलवर जयस्वालची विकेट -VIDEO

शुभमन गिलची गाडी ट्रॅकवर आली होती. मात्र बोलँडने त्याला ३१ धावांवर बाद केलं. कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. रोहितकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो ३ धावा करत माघारी परतला. भारतीय संघाला अवघ्या ८७ धावांवर ५ मोठे धक्के बसले आहेत. त्यानंतर रिषभ पंतने संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली. मात्र तो २१ धावा करत माघारी परतला.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com