Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Afghanistan vs India, 1st T20I: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी अनोखा सोहळा पाहायला मिळाला. ‘जन गण मन’पूर्वी ‘वंदे मातरम’ वाजवण्यात आलं आणि सामना सुमारे चार मिनिटे उशिरा सुरू झाला.
INDIA VS AFGHANISTAN 1ST T20I: VANDE MATARAM PLAYED BEFORE NATIONAL ANTHEM IN DELHI
INDIA VS AFGHANISTAN 1ST T20I: VANDE MATARAM PLAYED BEFORE NATIONAL ANTHEM IN DELHI
Published On

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होतोय. सामन्याची सुरुवात मात्र अनोख्या पद्धतीने झाली पहिल्यांदाच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यापूर्वी राष्ट्रगीत 'जन गण मन'च्या आधी 'वंदे मातरम' वाजवण्यात आलं. या नवीन व्यवस्थेमुळे, नाणेफेकीपूर्वीचा सोहळा नेहमीपेक्षा जास्त वेळ चालला. तर सामना नियोजित वेळेपेक्षा सुमारे चार मिनिटे उशिरा सुरू झाला.

पहिल्यांदाच राष्ट्रीय गीत वाजवण्यात आलं

सामन्यापूर्वीच्या सोहळ्यादरम्यान, जेव्हा राष्ट्रगीताच्या आधी 'वंदे मातरम' वाजवण्यात आले. त्यामुळे स्टेडियममधील प्रेक्षक, तसेच प्रेस बॉक्समधील काही जण आश्चर्यचकित झाले. भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यापूर्वी अशा प्रकारची व्यवस्था पहिल्यांदाच राबवण्यात आली होती. राष्ट्रीय गीत वाजवल्यानंतर राष्ट्रगीत जन गण मन ही वाजवण्यात आले. त्यामुळे संपूर्ण नाणेफेकीपूर्वीचा सोहळा काहीवेळ उशिरापर्यंत चालला.

INDIA VS AFGHANISTAN 1ST T20I: VANDE MATARAM PLAYED BEFORE NATIONAL ANTHEM IN DELHI
Cricket Rule : नवख्यांपासून दिग्गज खेळाडूंपर्यंत...सगळ्याच क्रिकेटपटूंचं टेन्शन वाढणार; BCCI लागू करणार नवा नियम

सर्वप्रथम 'वंदे मातरम' वाजवण्यात आले, त्यानंतर 'जन गण मन' हे राष्ट्रगीत सादर करण्यात आले. पहिल्यांदाच लागू करण्यात आलेल्या नवीन प्रणालीमुळे सामना नियोजित वेळेपेक्षा सुमारे चार मिनिटे उशिरा सुरू झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांपूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याची भारतीयांची परंपरा आहे. मात्र, यावेळी ही परंपरा थोडी बदलण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com