U19 World Cup: युवा टीम इंडियाची नवव्यांदा अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये एन्ट्री, सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

U19 World Cup Team India News: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. युवा टीम इंडियाने नवव्यांदा अंडर-१९ विश्वचषकात एन्ट्री केली आहे.
U19 World Cup
U19 World CupSaam tv
Published On

U19 World Cup News:

अंडर-१९ विश्वचषकाच्या सेमीफायनमध्ये युवा टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने एका पाठोपाठ सहा सामने जिंकले आहेत. आजचा सेमीफायनलमध्ये सामना जिंकत युवा टीम इंडियाने नवव्यांदा अंडर-१९ विश्वचषकात एन्ट्री केली आहे. (Latest Marathi News)

युवा टीम इंडियाने अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर दोन गडी राखून विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत नवव्यांदा पराभूत केले आहे.

टीम इंडिया अंडर-१९ विश्वचषकात याआधी पाचवेळा विजेता ठरला आहे. तर टीम इंडिया तीन वेळा फायनलमध्ये पराभूत झाली आहे. अंडर-१९ विश्वचषकाचा अंतिम सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना हा ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तानशी होऊ शकतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

U19 World Cup
Mumbai Open 2024: हैदराबादच्या श्रीवल्लीचा मुंबई ओपन स्पर्धेतील मुख्य फेरीत प्रवेश; नाओ हिबिनोला देणार आव्हान

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. भारताकडून कर्णधार उदय सहारने दमदार खेळी खेळली. ३२ धावांवर चार गडी बाद झाल्यानंतर सचिन धससोबत १७१ धावांची भागादारी रचली.

U19 World Cup
Beed Sachin Dhas Exclusive: बीडचा सुपुत्र ते टीम इंडिया! सचिन धस याचा धडाकेबाज प्रवास

सचिन धस ९६ धावांवर बाद झाला. तर सहारन ४९ व्या षटकात बाद झाला आहे. सहारनचा विकेट २४४ धावांवर गेला. टीम इंडियाला एक धावांची गरज असताना सहारन बाद झाला. त्यानंतर राज लिबांनीने चौकार मारत सामना जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com