India and New Zealand Test: पावसाने बदलली वेळ! बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कसे असेल हवामान? जाणून घ्या Weather रिपोर्ट

India and New Zealand Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिला दिवशी पावसाने व्यत्यय आणला. आता सर्व आशा दुसऱ्या दिवसाच्या खेळावर विसावल्या आहेत. पण दुसऱ्या दिवशी बंगळुरूचे हवामान कसे असेल? हे जाणून घेऊ.
India and New Zealand Test: पावसाने बदलली वेळ! बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी  कसे असेल हवामान? जाणून घ्या Weather रिपोर्ट
Published On

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना आजपासून म्हणजेच १६ ऑक्टोबरपासून बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू होणार होता, पण पावसाने संपूर्ण खेळ बिघडला. पहिल्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही. एवढेच नाही तर या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. दरम्यान ओल्या मैदानामुळे सामना रद्द करण्यात आला आहे.

खेळाच्या पहिल्या दिवशी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. दुपारी पाऊस थोडा थांबल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास अंपायर आणि इतर सामना अधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी केली. मात्र तपासणीच्या अर्ध्या तासानंतर पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुसऱ्या दिवशी सामना लवकर सुरू होईलच

सामन्याच्या पहिल्या दिवशी सकाळपासून पाऊस पडत होता. त्यामुळेच दोन्ही संघाचे कर्णधार सकाळी ९ वाजता नाणेफेकसाठीही मैदानात येऊ शकले नाहीत. मात्र पाऊस असूनही स्टेडियममध्ये अनेक प्रेक्षक जमले होते जे आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहायला आले होते. मात्र सर्वांच्या अपेक्षांवर पावसाने पाणई फेरलं. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा दुसऱ्या दिवसाच्या खेळाकडे लागल्या आहेत. पहिल्या दिवसातील पावसाने धुतल्याने दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी ९ वाजता नाणेफेक होणार होती आणि सामना सकाळी ९.३० वाजता सुरू होणार होता. आता यावेळेत बदल करण्यात आलाय.आता दुसऱ्या दिवशी खेळ १५ मिनिटे आधी म्हणजेच ९.१५ वाजता सुरू होईल आणि नाणेफेक ८.४५ वाजता होईल. पहिल्या दिवसाच्या षटकांचे नुकसान दुसऱ्या दिवशी भरून काढता यावे यासाठी असे करण्यात आले आहे.

India and New Zealand Test: पावसाने बदलली वेळ! बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी  कसे असेल हवामान? जाणून घ्या Weather रिपोर्ट
IND vs NZ, 1st Test: न्यूझीलंडला मोठा धक्का! संघातील प्रमुख खेळाडू पहिल्या कसोटीला मुकणार

खेळावर पावसाचे संकट

पहिल्या दिवसाच्या खेळावर पाणी फेरल्यानंतर आता चाहत्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की दुसऱ्या दिवसाचा सामना वेळेवर सुरू होणार की पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांना निराश व्हावे लागेल. भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पाऊस येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

Accuweather च्या अहवालानुसार, सकाळी आकाश ढगाळ असेल आणि 40 ते 50 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुपारनंतरही पावसाची 40 टक्के शक्यता आहे. एकूणच दिवसभर पाऊस होणार असल्याने खेळावर पावसाचे संकट आहे.

India and New Zealand Test: पावसाने बदलली वेळ! बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी  कसे असेल हवामान? जाणून घ्या Weather रिपोर्ट
Paras Mhambrey: मुंबई इंडियन्सचा मास्टरस्ट्रोक! रोहितचा विश्वासू ताफ्यात, टीम इंडियाला मिळवून दिला वर्ल्डकप!

पावसाच्या धोक्यात, आनंदाची बातमी म्हणजे, दुसऱ्या दिवसाऐवजी पहिल्याच दिवशी काही तांत्रिक कामे पूर्ण झाली असून त्यात हॉक आय सारख्या यंत्रणांचाही समावेश आहे. त्याचबरोबर चिन्नास्वामी स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्थाही चांगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com