Ind Vs SL T20 Series: टीम इंडियाकडून श्रीलंकेचा करेक्ट कार्यक्रम, 'हे' पाच खेळाडू ठरले गेमचेंजर

तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या विजयासोबतच भारतीय संघाने टी ट्वेंटी मालिकाही आपल्या खिशात घातली.
IND vs Sl 3rd T20
IND vs Sl 3rd T20Saam Tv
Published On

Ind Vs SL T20 Siries: सुर्यकुमार यादवच्या वादळी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या (Srilanka) तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या विजयासोबतच भारतीय संघाने टी ट्वेंटी मालिकाही आपल्या खिशात घातली. तब्बल ९१ धावांनी मिळवलेला विजय टीम इंडियासाठी खुपच खास ठरला. कारण पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाला अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने १६ धावांनी भारतीय संघावर मात केली होती.

मात्र सामन्यातील निर्णायक आणि अखेरचा सामना एकतर्फी झाला, असेच म्हणावे लागेल.या सामन्यावर पहिल्यापासून भारतीय संघाने पकड मजबूत केली होती. पाहूया या दमदार विजयाचे पाच शिल्पकार.

IND vs Sl 3rd T20
Prakash Mahajan: 'उद्धव ठाकरेंना आजारी पाडलं गेल कारण...' प्रकाश महाजनांचा रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप; उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल

1. अक्षर पटेल- फिरकीपटू अक्षर पटेलने संघाला रविंद्र जडेजाची उणीव भासू दिली नाही. तीन सामन्यांच्या या मालिकेत अक्षर पटेलने ११७ रन कुटल्या त्यासोबत तीन महत्वपूर्ण बळीही घेतले. दुसऱ्या सामन्यात अक्षर पटेलच्या धमाकेदार फलंदाजी केली. त्याच्या या अष्टपैलू खेळीमुळे त्याला सामनावीर चा मानही मिळाला आहे.

2. सूर्यकुमार यादव: जगातील नंबर 1 टी-20 फलंदाज सूर्यकुमार यादवचा उत्कृष्ट फॉर्म या मालिकेतही कायम राहिला. सूर्याने तीन सामन्यांत 85 च्या सरासरीने आणि 175.25 च्या स्ट्राईक रेटने 170 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक शतक आणि एक अर्धशतक झळकले. पाहिले तर सूर्याने या मालिकेत 12 षटकार आणि 11 चौकार मारले आणि तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

3. उमरान मलिक: वेगवान गोलंदाज उमरान मलिकसाठी ही मालिका जबरदस्त होती. उमरान मलिकने तीन सामन्यांत केवळ 15.14 च्या सरासरीने सात विकेट घेतल्या. यादरम्यान उमरान मलिकने श्रीलंकेच्या खेळाडूंना आपल्या वेगवान आणि उसळीने खूप त्रास दिला. उमरान मलिक या टी-२० मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

IND vs Sl 3rd T20
Urfi Javed: उर्फी प्रकरणात आता करुणा धनंजय मुंडे-शर्मा यांची उडी; म्हणाल्या, 'उर्फी जावेदला सपोर्ट करणाऱ्या महिला नेत्या बिनडोक...'

4. शिवम मावी: वेगवान गोलंदाज शिवम मावीने या मालिकेद्वारेच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. मुंबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात शिवम मावीने चार विकेट घेत स्वप्नवत पदार्पण केले. मात्र, शिवम मावीला पुढच्या दोन सामन्यात विकेट घेता आली नाही.

हार्दिक पांड्या - कर्णधार हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) बॅट आणि बॉलही या मालिकेत फारसा चालला नाही. मात्र त्याच्या कल्पक नेतृत्वशैलीमुळे टीम इंडियाला मालिका खिशात घालणे सोपे झाले. मालिकेत कर्णधार हार्दिक पांड्याने अनेक डावेपेच आणि रणनिती आखली, ज्याचा फायदा भारतीय संंघाला झाला. पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात त्याने शेवटचे षटक अक्षर पटेलला देण्याचा निर्णय घेतला. तर शेवटच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com