ज्ञानेश्वर हिंगोलीकर
Urfi Javed: उर्फी जावेद प्रकरणी राजकीय वर्तुळातून रोज नवीन प्रतिक्रिया येत आहेत. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला. त्यानंतर महिला आयोगाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली. अशात उर्फी प्रकरणात आता करुणा धनंजय मुंडे-शर्मा यांनी उडी घेतली आहे. तसेच उर्फी जावेदला सपोर्ट करणाऱ्या महिला नेत्या बिनडोक आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. (Urfi Javed Latest News)
"आज उर्फी जावेदच्या कपड्यांवरून जो काही वाद सुरू आहे त्यात तिच्या कपड्यांवर मी देखील विरोध करते. इकडे-तिकडे अर्धनग्न फिरणे ही सर्वच महिलांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. ज्या महिला आणि राजकारणी महिला उर्फीला पाठींबा देत आहेत त्यांना मी सांगते की, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही अशा चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत आहात. ज्या ज्या महिला उर्फीच्या मताशी सहमत आहेत त्या सर्व बिनडोक आहेत, असे करुणा धनंजय मुंडे-शर्मा यांनी म्हटले आहे.
उर्फी जावेदवर सुरू असलेल्या या वादात काल तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तिच्या अंगावर पुरळ उठलेले दिसत होते. उर्फीने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मला कपड्यांची ॲलर्जी आहे. अंगावर जास्त कपडे असले की, मला असा त्रास होतो. यावर चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फीची कानउघाडणी केली. "उर्फीला जर जास्त कपड्यांची ॲलर्जी असेल, तर आपल्याकडे औषधं आहेत. तिचं थोबाड फोडण्यापूर्वी एकदा तिला साडी चोळी देऊ, साडी चोळी देऊन ऐकलं नाही तर तिचं थोबाड फोडू", असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. अशात यावेळी त्यांनी महिला आयोने पाठवलेल्या नोटीसमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली. उर्फी जावेदवर सुरू असलेल्या या वादात आता करुणा धनंजय मुंडे-शर्मा यांनी देखील उडी घेतल्याने पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.