Prakash Mahajan: 'उद्धव ठाकरेंना आजारी पाडलं गेल कारण...' प्रकाश महाजनांचा रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप; उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल

बापाने दिलेलं भांडवल दहा वर्षात बसवणारा हा नतद्रष्ट पोरगा निघाला, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
Rashmi Thackeray Prakash Mahajan
Rashmi Thackeray Prakash MahajanSaamtv
Published On

Prakash Mahajan: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरे यांच्यामुळेच उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले, असा आरोप त्यांनी केला आहे. मनसेच्या घे भरारी या अभियानाच्या कार्यक्रमात प्रकाश महाजन बोलत होते, यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे.

Rashmi Thackeray Prakash Mahajan
IND vs SL 3rd T20: हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कमाल; श्रीलंकेला धूळ चारत मालिकाही जिंकली

याबाबत अधिक माहिती अशी की, मनसेच्या (MNS) घे भरारी अभियानात बोलताना प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री करेन असे सांगितले होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंना आपणचं मुख्यमंत्री होऊ असे वाटत होते. मात्र घरात सैंदद्रीने केस, मोकळे सोडले, आणि घरात केस मोकळे सोडल्यावर काय होत हे चांगलच माहित आहे. असा टोलाही महाजन यांनी लगावला.

याबद्दल पुढे बोलताना ते म्हणाले की, "सैरंद्रीला नवरा मुख्यमंत्री होतो की नाही यात काही रस नव्हता. त्यांना मुलाला मंत्री करायचं होतं. पण घरच्या तापापायी त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि कारभार सुरू केला. मुळातच औकत, म्हणजे क्षमता, औकात नसलेल्या माणसाला गादीला बसवलं. मला संशय आहे की आजारपण सुद्धा खरं की खोटं होतं. कारण कारभार यांना करायचा होता. त्यामुळे यांना आजारी पाडलं अन् कारभार सुरू केला."

Rashmi Thackeray Prakash Mahajan
Urfi Javed: उर्फी प्रकरणात आता करुणा धनंजय मुंडे-शर्मा यांची उडी; म्हणाल्या, 'उर्फी जावेदला सपोर्ट करणाऱ्या महिला नेत्या बिनडोक...'

यावेळी प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर (Udhav Thackeray) सडकून टीका केली. "उद्धव ठाकरे बापाचं भांडवल आणि बापचं नाव घेऊन आले. त्यांना बाकीचा काही अनुभव नाही. एखादी शाखा चालवण्याचा अनुभव नाही. हे सरकार स्थापन झालं. या सरकारनं असं काय केलं? कोरोना आला मुख्यमंत्री घरात बसले. आज काय अवस्था आहे? तुझ्या शिवसेना भवनावर लोक दावा सांगू लागले, बापाने दिलेलं भांडवल दहा वर्षात बसवणारा हा नतद्रष्ट पोरगा निघाला, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com