टीम इंडियाने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. एकवेळ हा सामना दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकणार असं सर्वांनाच वाटत होतं. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढलं.
अखेरच्या ३० चेंडूत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजयासाठी फक्त ३० धावाच हव्या होत्या. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांवर मोठे दडपण होते. तेव्हा कर्णधार रोहित शर्माने चेंडू जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवला. जसप्रीतने १६ वे षटक चांगले टाकले. पण त्यानंतर हार्दिक पांड्याच्या षटकात एक अशी गोष्ट घडली, ज्यामुळे हा सामना भारताच्या बाजूने झुकला.
बुमराहने १६ व्या षटकात केवळ ४ धावाच खर्च केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २४ चेंडूत २६ धावांची गरज होती. क्लासेन आणि मिलर मैदानावर तळ ठोकून होते. तेव्हा हार्दिक पांड्या गोलंदाजीला आला आणि त्याने १७ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हेनरी क्लासेनला बाद केलं. इतकंच नाही, तर त्याने या षटकात केवळ ४ धावाच खर्च केल्या.
तेथून टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यानंतर बुमराहने १८ व्या षटकात जसप्रीत बुमराहने केवळ २ धावा देत मार्को यान्सनचा त्रिफळा उडवला. आता शेवटच्या १२ चेंडूत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २० धावांची गरज होती. त्यानंतर अर्शदीप सिंह गोलंदाजीसाठी आला.
त्यानेही १९ व्या षटकात फक्त ४ धावाच खर्च केल्या. त्यामुळे आफ्रिकन संघावरील दडपण वाढलं. शेवटच्या षटकात त्यांना तब्बल १६ धावांची गरज होती. रोहित शर्माने चेंडू पुन्हा हार्दिक पांड्याकडे सोपवला. हार्दिकने विश्वास सार्थ ठरवत पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरची विकेट काढली. सूर्यकुमारने सीमारेषेजवळ घेतलेला कॅच अफलातून होता.
त्यानंतर आणखी एक विकेट घेत हार्दिकने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. दरम्यान, टीम इंडियाच्या या विजयात सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. पण हार्दिक पांड्याने टाकलेले १७ वे आणि २० वे षटक निर्णायक ठरले. या दोन ओव्हरमध्ये त्याने हेनरी क्लासेन आणि डेव्हिड मिलरला बाद केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.