भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ४ टी-२० सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना स्पोर्ट्स पार्क स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यातही भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती. मात्र या सामन्यातही सलामीला फलंदाजीला आलेला संजू सॅमसन शून्यावर माघारी परतला.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजयाची नोंद केली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून संजू सॅमसनने धावांचा पाऊस पाडला होता.
पहिल्याच सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगलाच समाचार घेतला होता. त्याने या सामन्यात शतक झळकावलं होतं. यापूर्वी बांगलादेशविरुद्ध झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यातही त्याने शतक झळकावलं होतं. त्यानंतर पुढील सामन्यातही त्याने शतक झळकावलं. यासह तो सलग २ सामन्यांमध्ये २ शतकं झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला होता.
संजू सॅमसन सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर माघारी परतला आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात २ चेंडूनंतर तिसऱ्या चेंडूवर त्याचा लेग स्टम्प हवेत उडून पडला होता. आता मालिकेतील तिसऱ्या सामन्यात १ चेंडू खेळल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर त्याचा ऑफ स्पम्प उडाला आहे. यासह संजू सॅमसनच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. ३२ डावात फलंदाजी करताना संजू सॅमसन ६ वेळेस शून्यावर बाद झाला आहे.
या यादीत भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. रोहित टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ वेळेस शून्यावर बाद झाला आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेला संजू सॅमसन ७ वेळेस शून्यावर माघारी परतला आहे. तर केएल राहुल ५ वेळेस शून्यावर माघारी परतला आहे.
रोहित शर्मा- १२ वेळेस
विराट कोहली- ७ वेळेस
संजू सॅमसन - ६ वेळेस
केएल राहुल - ५ वेळेस
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.