IND vs PAK: भारत- पाकिस्तान हायव्होटेज सामन्याचा आज पुन्हा थरार; फ्रीमध्ये कुठे पाहाल सामना?

IND vs PAK Asia Cup 2025 Match: आशिया कपच्या सुपर-४ सामन्यात आज पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानच्या भिडणार आहे. हा सामना तुम्ही कुठे मोफत पाहू शकता, जाणून घ्या.
india vs pakistan
india vs pakistangoogle
Published On

IND vs PAK: आशिया कप २०२५ मध्ये आज पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तानच्या हायवोल्टेज सामन्याचा थरार रंगणार आहे. सुपर ४ मधील हा महामुकाबला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही कर्णधार अर्धा तास आधी म्हणजेच ७. ३० वाजता नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. टीम इंडियाने ग्रुप स्टेज सामन्यात पाकिस्तानला धूळ चारत स्पर्धेमध्ये विजयी सुरुवात केली. सामनादरम्यान, भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. यावर पाकिस्तानने आशियाकपमधून माघार घेण्याची धमकी दिली होती. परंतु, नेहमीप्रमाणे पाकिस्तानची पुन्हा एकदा नाच्चकी झाली. या हायव्होल्टेज सामना ड्रामाने भरपूर असून सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा खेळाडूंमधील हस्तांदोलनावर असेल. या सामन्याची लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे मोफत पाहू शकता, जाणून घ्या.

महामुकाबल्याची वेळ आणि ठिकाण

भारत आणि पाकिस्तान आज २१ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा भिडणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार ८ वाजता सुरु होईल तर कर्णधार ७. ३० वाजता नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. आतापर्यंत, या मैदानावर टीम इंडियाने दमदार कामगिरी केली आहे.

टिव्हीवर कुठे पाहू शकता सामना?

आशिया कप २०२५ मधील हा हाय-प्रोफाइल सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या सर्व चॅनलवर थेट प्रसारित होईल. जर तुमच्याकडे सोनी स्पोर्टचे पॅकेज असेल तर तुम्ही या सामन्याचा पूर्ण आनंद घेऊ शकता.

india vs pakistan
Irfan Pathan Vs Shahid Afridi: 'मर्द असशील तर समोर येऊन बोल'; शाहिद आफ्रिदीचं इरफान पठानला ओपन चॅलेंज

मोबाईलवर पाहा महामुकाबला

जर तुम्ही मोबाईलवर सामना पाहत असाल तर तुम्ही SONY LIV अॅप वर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. पण यासाठी तुमच्याकडे सबस्क्रीबशन असणे गरजेचे आहे. तसेच जियो टिव्ही आणि एअरटेल एक्सट्रीम सारख्या प्लॅटफॉर्मवर सोनी स्पोर्ट्स चॅनल उपलब्ध आहेत जेथे तुम्ही मोफत सामना पाहू शकता.

फ्री-मध्ये कसा पाहाल सामना?

ज्यांच्याकडे सोनी लिव्हचा सबस्क्रिप्शन नाही ते देखील हा सामना मोफत पाहू शकतात. तुम्ही डी डी स्पोर्ट्सवर हा सामना मोफत पाहू शकता. दूरदर्शन फक्त भारताचे सामने मोफत प्रसारित करत आहे, त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी ही एक नक्कीच आनंदाची बातमी आहे.

india vs pakistan
Asia Cup 2025: पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर; यूएईविरुद्ध सामना खेळण्यास नकार, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com