IND vs NZ, Semi Final: टीम इंडियाला मोठा धक्का! शुभमन गिलने वेदनेने कळवळत सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?

Shubman Gill Retired Hurt: या सामन्यात अर्धशतकी खेळी केल्यानंतर शुभमन गिलला मैदान सोडावं लागलं आहे.
shubman gill Injury Update
shubman gill Injury UpdateUpdate on shubman gill-twitter
Published On

Shubman Gill Injury Update:

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना सुरु आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अर्धशतक पूर्ण करुन शतकी खेळीच्या दिशेने वाटचाल करत असताना शुभमन गिलला मैदान सोडावं लागलं आहे.

शुभमन गिल रिटायर्ड हर्ट..

शुभमन गिल आणि रोहित शर्मा या दोघांनी या सामन्यात भारतीय संघाला जोरदार सुरुवात करुन दिली. दोघांमध्ये ७१ धावांची भागीदारी झाली. रोहित शर्मा ४७ धावा करत माघारी परतला. रोहित बाद झाल्यानंतर गिलने विराट सोबत मिळून मोर्चा सांभाळला आणि आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या १५० च्या पुढे पोहचवली. (Shubman Gill Retired Hurt)

shubman gill Injury Update
IND vs NZ: डायरेक्ट हिट, रनआऊट अन् वर्ल्डकपमधून एक्झिट! पाहा १४० कोटी भारतीयांचं मन दुखावणारा तो क्षण; VIDEO

नेमकं काय घडलं?

तर झाले असे की, २३ वे षटक सुरु होते. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर विराटने एक धाव घेतली. मात्र ही धाव पूर्ण करत असताना शुभमन गिलला क्रँम्प आल्याचं दिसून आला. त्याला धावताना त्रास होत होता.

त्यावेळी फिजियो मैदानावर आले. मात्र शुभमन गिलला होत असलेल्या वेदना पाहून डगआऊटमध्ये असलेल्या कर्धणार रोहित शर्माने त्याला मैदान सोडण्याचा इशारा केला. त्यामुळे तो ७८ धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला आहे. शुभमन गिलने मैदान सोडल्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. (Latest sports updates)

shubman gill Injury Update
World Cup 2023: सुपर ओव्हर की बाऊंड्री काऊंट? फायनल टाय झाल्यास कसा लागणार निकाल? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com