Virat Kohli: क्रिकेटच्या देवासमोर किंग कोहली नतमस्तक! शतकांच्या अर्धशतकानंतर सचिनने दिलेली रिॲक्शन व्हायरल; Video

Sachin Tendulkar Reaction On Virat Kohli Century: शतक पूर्ण करताच विराटने दिलेली रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे
sachin tendulkar
sachin tendulkar twitter
Published On

Sachin Tendulkar Reaction On Virat Kohli Century:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात रोहित आणि शुभमनने दमदार सुरुवात करुन दिल्यानंतर विराटने मोर्चा सांभाळला.

दरम्यान या सामन्यात कोहलीने विराट खेळी करत ५० वे शतक झळकावले आहे. त्याने सचिनच्या होम ग्राऊंडवर सचिनचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. दरम्यान हे शतक पूर्ण केल्यानंतर सचिनने दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हा सामना मुंबईच्या मैदानावर सुरु आहे. हा सामना पाहण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हजेरी लावली आहे. विराटने १०६ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. ४२ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर २ धावा काढत त्याने आपलं शतक पूर्ण केलं. हे शतक पूर्ण केल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेले ३३ हजार प्रेक्षक केवळ विराट... विराट नावाचा गजर करत होते.

तर आपलाच रेकॉर्ड आपल्या डोळ्यासमोर मोडताना पाहत असलेल्या सचिन तेंडुलकरचाही आनंद गगनात मावेनासा झाला. शतक पूर्ण केल्यानंतर विराटने हटके सेलिब्रेशन केलं. त्याने नतमस्तक होत सचिनकडे पाहिलं. दरम्यान सचिनही त्याचं कौतुक करताना दिसून आला. सचिनने दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

विराटचं ऐतिहासिक शतक..

विराटने आपल्या वनडे कारकिर्दीतील ५० शतक पूर्ण केलं आहे. असा कारनामा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे सोडलं आहे. सचिनने ४५२ इनिंगमध्ये आपलं शतक पूर्ण केलं होतं. तर विराटने २७९ व्या इनिंगमध्ये आपलं ५० वे शतक पू्र्ण केलं आहे.

sachin tendulkar
Virat Kohli Century: विराट 'विक्रमादित्य'! सचिन तेंडुलकरसमोरच मोडला सर्वाधिक शतकांचा विक्रम, वनडेत सर्वाधिक ५० शतके

वनडेत सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज..

विराट कोहली - ५० शतके*

सचिन तेंडुलकर- ४९ शतके

रोहित शर्मा - ३१ शतके

रिकी पाँटिंग - ३० शतके

सनाथ जयसूर्या - २८ शतके (Latest sports updates)

sachin tendulkar
Virat Kohli Record List: वानखेडे मैदान विराट वादळानं शहारलं; रिकी पॉन्टिंगला मागे टाकत वनडेत सर्वाधिक धावांच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com