IND vs NZ: भन्नाट कॅच!! डेवॉन कॉनव्हेने थेट हवेत घेतली झेप अन् एका हाताने घेतला अफलातून कॅच- VIDEO

Devon Conway Catch: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात सरफराज खान शून्यावर माघारी परतला आहे.
IND vs NZ: भन्नाट कॅच!! डेवॉन कॉनव्हेने थेट हवेत घेतली झेप अन् एका हाताने घेतला अफलातून कॅच- VIDEO
devon conwaytwitter
Published On

IND vs NZ 1st Test, Devon Conway Catch: बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी पावसाने तुफान बॅटिंग केली. त्यामुळे सामन्याची सुरुवात दुसऱ्या दिवशी झाली. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठे धक्के बसले आहेत.

डेवोन कॉनव्हेचा शानदार झेल

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना, रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी मैदानात आली. मात्र रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. रोहित पाठोपाठ विराट शून्यावर माघारी परतला.

IND vs NZ: भन्नाट कॅच!! डेवॉन कॉनव्हेने थेट हवेत घेतली झेप अन् एका हाताने घेतला अफलातून कॅच- VIDEO
IND vs NZ सामन्याला सुरुवात! टीम इंडियाचा टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय; शतक झळकावणारा फलंदाज प्लेइंग ११ मधून बाहेर

डेवोन कॉनव्हेचा शानदार झेल

शुभमन गिल संघाबाहेर झाल्यानंतर, सरफराज खानचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. मात्र या सामन्यात विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तर सरफराज खान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

सरफराज खानला हवी तशी सुरुवात करता आली नाही. तिसऱ्याच चेंडूवर त्याने स्टेपआऊट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नाही. त्यामुळे चेंडू हवेत गेला. त्यावेळी डेवोन कॉनव्हेने डाईव्ह मारत शानदार झेल घेतला. त्याने घेतलेल्या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

IND vs NZ: भन्नाट कॅच!! डेवॉन कॉनव्हेने थेट हवेत घेतली झेप अन् एका हाताने घेतला अफलातून कॅच- VIDEO
IND vs NZ दुसऱ्या कसोटीतून शुभमन गिल बाहेर! समोर आलं टेन्शन वाढवणारं कारण

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, विराट कोहली, रिषभ पंत, केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड - डेवोन कॉनव्हे, टॉम लेथम, विल यंग, रचिन रविंद्र, डॅरेल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मॅट हेनरी, टीम साऊदी, एजाज पटेल, विलियम ओ रुक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com