IND vs NZ 1st T20I Today Cricket : पहिल्या टी २० मध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय; नमन- संजू ठरले विजयाचे शिल्पकार

IND vs NZ 1st T20I Team India Won: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे खेळला गेला. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी २२६ धावांचे मोठे लक्ष्य ठेवलं होतं. या सामन्यात भारतीय संघानं शानदार विजय मिळवलाय.
India vs New Zealand first T20I match updates October 22 2026
India vs New Zealand first T20I match updates October 22 2026saam tv
Published On: 

'सरपंच' श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियानं न्यूझीलंडची क्रिकेटनगरी असलेल्या ख्राईस्टचर्चमध्येच किवींवर 'सर्जिकल स्ट्राइक' करून ऐतिहासिक विजय मिळवला. न्यूझीलंडनं उभा केलेला धावांचा डोंगर भारताच्या धुरंधरांनी अखेरच्या षटकात पार केला आणि आम्हीच टी २० क्रिकेटचे महारथी आहोत हे अवघ्या क्रिकेटविश्वाला दाखवून दिलं.

न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २२६ धावांचं भलंमोठं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडच्या मैदानात भारतीय धुरंधर ढेपाळतात असं नेहमी बोललं जात होतं, पण आज, भारताचा 'चेट्टा' संजू सॅमसन याची वादळी सुरुवात, अखेरच्या षटकांत श्रेयस अय्यर आणि नमन धीरनं केलेल्या तुफानी खेळीमुळं विजय मिळवून हा बऱ्याच वर्षांपासून बसलेला शिक्का पुसला गेला. मायदेशात असो की विदेशात टी २० क्रिकेटचे आम्हीच किंग आहोत, हे भारतीय फलंदाजांनी आजच्या विजयानं पुन्हा सिद्ध करून दाखवलं.

या धमाकेदार खेळाच्या जोरावर टीम इंडियानं ४ विकेट राखत न्यूझीलंडच्या संघाचा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातील भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्युझीलंडच्या संघानं फलंदाजीचं आमंत्रण स्वीकारत भारतीय संघासमोर मोठी धावसंख्या उभारली. न्यूझीलंडच्या संघाने २० षटकात ४ गडी गमावत २२५ धावा केल्या होता. यजमान संघ न्युझीलंडची धावसंख्या पाहून सामना जिंकणं अवघड होईल असा चाहत्यांना वाटत होतं.

India vs New Zealand first T20I match updates October 22 2026
Mumbai Indians: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; 3 वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या दिग्गजानं १० वर्षांनी दिला तडकाफडकी राजीनामा

परंतु न्युझीलंडच्या संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी आक्रमक फंलदाजी करत डोंगराएवढं मोठं वाटणारं आव्हान छोटं वाटू लागलं. संजू सॅमसन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी आक्रमक फंलदाजी करत अवघ्या ५.५ षटकांत ९३ धावांची भागीदारी केली. सॅमसनने ३३ चेंडूंत ६७ धावा केल्या. यात ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता, तर अभिषेकने १२ चेंडूंत २९ धावा केल्या. यात ३ षटकार आणि २ चौकार होते.

मायकेल ब्रेसवेलने अभिषेकला बाद करून ही सलामीची जोडी फोडली. त्यानंतर न्युझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने सॅमसनची विकेट घेतली. त्यानंतर ब्रेसवेलने तिलक वर्माला ६ धावांमध्ये बाद केलं. तर इशान किशनला अवघ्या १ धाव संख्या असताना सँटनरच्या शिकार झाला. यामुळे चांगली सुरुवात केल्यानंतरही १२२ धावांपर्यंत पोहोचताना टीम इंडियाने ४ बळी गमावले होते.

India vs New Zealand first T20I match updates October 22 2026
BCCI ची मोठी घोषणा; आगरकरनंतर २४ कसोटी सामने खेळलेल्या माजी क्रिकेटपटूवर निवड समिती प्रमुखपदाची जबाबदारी

सलामीवीराची फटकेबाजी

संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या दोन्ही सलामीवीरांनी भारताला ५.५ ओव्हरमध्येच ९३ धावांची पार्टनरशीप करून दिली. अभिषेक शर्माने १२ बॉलमध्ये २४१ .६७ च्या स्ट्राईक रेटने २९ धावा केल्या. यात ३ षटकार आणि २ चौकराचा समावेश होता. तर संजू सॅमसनने ३३ चेंडूमध्ये २०३.०३ चा स्ट्राईक रेटनं ६७ धावांची वादळी खेळी केली. यात ८चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. तर कर्णधार श्रेयस अय्यरने २८ बॉलमध्ये ४२ धावा करून टीम इंडियाला विजयापर्यंत नेलं.

चार विकेट गमावल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी पाचव्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. त्यांच्या खेळीनं भारतीय संघानं सामन्यात वर्चस्व बनवलं. अक्षर पटेलने २४ धावा केल्या. मात्र लॉकी फर्ग्युसनने त्याला आपला शिकार बनवलं. त्यानंतर श्रेयसने नमन धीरसोबत मिळून सहाव्या विकेटसाठी २२ चेंडूंमध्ये ४३ धावा जोडल्या.

नमन धीरची शानदार फलंदाजी

मधल्या षटकांमध्ये न्यूझीलंडने अचानक पुनरागमन केल्यानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने अक्षर पटेलच्या साथीने डाव सावरला. या जोडीने पाचव्या विकेटसाठी अवघ्या २४ चेंडूंमध्ये ४५ धावांची भागीदारी केली. अखेर अक्षर पटेल १४ चेंडूंमध्ये २४ धावा काढून बाद झाला. त्याच्या जागी मैदानात आलेल्या युवा खेळाडू नमन धीरने खेळातील आपलं कौशल्य दाखवलं. त्याने एका टोकाकडून वेगाने धावा काढत संघावरील दबाव प्रभावीपणे कमी केला.

कर्णधार अय्यर ४२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर, नमन धीरने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने अवघ्या १५ चेंडूंत नाबाद ४२ धावा करत सामना जिंकवून दिला. यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com