IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

IND vs NZ 1st T20 Team India Win : पहिल्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव केला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने विक्रमी २३८ धावा करत किवींचा पराभव केला.
IND vs NZ 1st T20 Team India Win  :
Indian players celebrate after defeating New Zealand in the first T20 match of the series.saam tv
Published On
Summary
  • भारताचा न्यूझीलंडवर 48 धावांनी दणदणीत विजय

  • टीम इंडियाने 238 धावांचा डोंगर उभा केला

  • न्यूझीलंडविरुद्ध भारताची सर्वोच्च टी-20 धावसंख्या

न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत पहिल्याच सामन्यात भारताने 48 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर किवींना धूळ चारत टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी मैदानात फटकेबाजी करत न्यूझीलंडसमोर 20 षटकांत 238 धावांचा डोंगर उभा केला. दरम्यान ही धावसंख्या न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली.

IND vs NZ 1st T20 Team India Win  :
Ind Vs NZ T20 Match : 4, 4, 4... अभिषेक शर्मा तळपला, पहिल्याच टी २० सामन्यात स्फोटक अर्धशतकी खेळी

त्यानंतर भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाचे नाकीनऊ आले. ग्लेन फिलिप्सने धमाकेदार खेळी केली. त्याने 40 चेंडूत 78 धावा केल्या. पण बाद झाल्यानंतर एकाही खेळाडूला मोठी खेळी उभारता आली नाही. यामुळे किवी फलंदाजांना निर्धारित षटकांत केवळ 200 धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडने शेवटपर्यंत संघर्ष केला, पण विजय मिळवता आला नाही.

IND vs NZ 1st T20 Team India Win  :
T20 World Cup: भारतात या! नाहीतर वर्ल्ड कप विसरा; ICCची वॉर्निंग, बांगलादेशला हट्टीपणा पडला महागात

अशी होती भारतीय संघाची फलंदाजी

अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे सलामीसाठी आले. पण सलामी फलंदाज संजू सॅमसन केवळ 7 चेंडूमध्ये 10 धावा करून बाद झाला.काइल जैमीसनने त्याला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला ईशान किशनही फार काळ टिकू शकला नाही. तो फक्त 8 धावा करू शकला.

यानंतर अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मात्र त्यानंतर सूर्याकुमार यादव 32 चेंडूमध्ये 22 धावा करून बाद झाला. मिचेल सॅन्टनरने त्याला बाद केलं.

अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंगची वादळी खेळी

अभिषेकने 240 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. त्याने अवघ्या 35 चेंडूमध्ये 84 धावांची धमाकेदार खेळी केली. यात 5 चौकार आणि 8 षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर शिवम दुबे फंलदाजीसाठी आला पण तो 9 धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याने 16 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी केली. अखेरीस रिंकू सिंगने 20 चेंडूमध्ये नाबाद 44 धावांची स्फोटक खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com