Ind Vs NZ T20 Match : 4, 4, 4... अभिषेक शर्मा तळपला, पहिल्याच टी २० सामन्यात स्फोटक अर्धशतकी खेळी

ind vs nz t20 abhishek sharma half century : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्याच टी २० सामन्यात अभिषेक शर्माची बॅट तळपली आहे. त्यानं पहिल्याच सामन्यात अवघ्या २२ चेंडूंत अर्धशतक झळकावलं.
Ind vs NZ 1st T20 match Abhishek Sharma
Ind vs NZ 1st T20 match Abhishek Sharmabcci
Published On

टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला जगातला अव्वल फलंदाज अभिषेक शर्मा यानं न्यूझीलंडविरुद्धच्या टी २० मालिकेतील पहिल्याच सामन्यात स्फोटक अर्धशतकी खेळी केली. त्यानं अवघ्या २२ चेंडूंत अर्धशतक झळकावलं. हे त्याचे टी २० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सातवं अर्धशतक आहे. या खेळीत चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे.

नागपूरच्या मैदानात टी २० सामना होत आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. सलामीला टी २० मधील स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे सलामीला उतरले. न्यूझीलंडकडून पहिलं षटक जेकब डफी यानं टाकलं. या षटकात ८ धावा दिल्या. अभिषेकनं या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकला.

त्यानंतर भारताला पहिला झटका मिळाला तो संजू सॅमसनच्या रुपानं. त्यानं ७ चेंडूंत अवघ्या १० धावा केल्या. संजूला काइल जॅमिसन यानं दुसऱ्याच षटकात झेलबाद केलं. रचिन रविंद्र यानं त्याचा झेल पकडला. त्यानंतर आलेल्या इशान किशननं पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून खातं उघडलं. पण बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय कमबॅक करणारा इशान फार काही करू शकला नाही. दोन चौकार ठोकून आक्रमक सुरुवात केलेला इशान डफीनं टाकलेल्या चेंडूवर चॅपमॅनच्या हातात झेल देऊन बाद झाला.

दुसरीकडे अभिषेककडून तुफानी फटकेबाजी सुरूच होती. अवघ्या ५ षटकांतच १० च्या सरासरीने संघाच्या ५० धावा झाल्या होत्या. अभिषेक शर्मा एक बाजू भक्कमपणे लढत आहे. पॉवर प्लेमध्ये भारताच्या २ बाद ६८ धावा झाल्या होत्या. १० षटकांचा खेळ संपला असून, भारताच्या २ बाद ११७ धावा झाल्या आहेत. अभिषेक शर्मा हा ६० धावांवर खेळत असून, सूर्यकुमार यादवने त्याला चांगली साथ दिली. कर्णधार सूर्यकुमार ३१ धावांवर बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com