IND vs ENG: संघांत मोठ्या बदलाची शक्यता; जाणून घ्या संभाव्य प्लेईंग 11

भारतीय संघ (Team India) मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
IND vs ENG
IND vs ENGSaam Tv
Published On

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी (Third Test Match) सामना आजपासून लीड्स येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघ (Team India) मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. विराटच्या सैन्याला तिसरी कसोटी जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या संघाला मालिकेत आपले खाते खोलायचे आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 151 धावांनी पराभव केला होता. त्याचबरोबर पहिला कसोटी सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही.

तिरसा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंना अनेक विक्रम मोडण्याची शक्यता आहे. त्यात विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिक्रेटमध्ये 23,000 धावा पुर्ण करण्यासाठी फक्च 63 धावांची गरज आहे. त्याच बरोबर जसप्रित बुमराहला आपल्या 100 बळींचा टप्पा पार करण्यासाठी 5 बळींची गरज आहे. भारतीय संघाला 2007 नंतर मालिका जिंकण्याचीही संधी असणार आहे. दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाजांचा दबदबा राहिला होता. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. रविंद्र जडेजाच्या जागेवर आर. आश्विन संधी मिळण्याची शक्यता आहे.

IND vs ENG
IND vs ENG: लीड्सवर जसप्रित बुमराहच्या निशाण्यावर कपिल देवचा रेकाॅर्ड

भारताचा संभाव्य संघ

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), आर अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंडचा संभाव्य संघ

रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (यष्टिरक्षक), मोईन अली, सॅम करन, ओली रॉबिन्सन, साकिब महमूद, जेम्स अँडरसन

असे असेल हवामान

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाचा काहीच परिणाम दिसला नाही. तिसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पावसाचा शक्यता कमी आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com