भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 25 ऑगस्टपासून लीड्समध्ये (Yorkshire Cricket Ground) खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ (Team India) मालिकेत अजिंक्य आघाडी घेऊ शकतो. भारतीय संघ 2007 नंतर प्रथमच मालिका जिंकण्याच्या मार्गावर आहे. तिसऱ्या सामन्यात भारताचे अनेक खेळाडू काही विक्रम मोडू शकतात आणि अनेक खास कामगिरी करू शकतात. जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) कपिल देवचा (Kapil Dev) विक्रम मोडण्याची संधी आहे.
लीड्स कसोटी सामन्यात बुमराहला आपली 100 बळी पूर्ण करण्याची संधी असणार आहे. भारताच्या या स्टार वेगवान गोलंदाजाने 22 कसोटी सामन्यात 95 बळी घेतले आहेत. जर त्याने लीड्समध्ये पाच विकेट्स मिळवल्या तर तो महान कर्णधार कपिल देवचा विक्रम मोडू शकतो. बुमराहला 100 बळी घेणारा वेगवान भारतीय वेगवान गोलंदाज बनण्याची संधी आहे.
कपिल देव बद्दल बोलायचे झाले तर त्याने 25 कसोटी सामन्यात 100 बळी घेतले आहेत . त्याचा विक्रम मोडण्याव्यतिरिक्त बुमराहला मनोज प्रभाकर आणि व्यंकटेश प्रसाद यांनाही मागे टाकण्याची संधी असणार आहे. मनोज प्रभाकरने आपल्या कारकिर्दीत 96 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर व्यंकटेश प्रसादच्या नावावर 95 बळी आहेत. भारतीय संघासाठी आतापर्यंत 7 गोलंदाजांनी 100 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.
भारतासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाबद्दल बोलताना, अनिल कुंबळे या प्रकरणात पहिल्या स्थानावर आहे. त्याने 132 कसोटी सामन्यांमध्ये 619 बळी घेतले आहेत. त्याच्यानंतर कपिल देवचा नंबर आहे. त्याने 131 कसोटी सामन्यांमध्ये 432, हरभजन सिंगने 103 सामन्यांमध्ये 417 बळी, रविचंद्रन अश्विनने 79 कसोटी सामन्यांमध्ये 413, इशांत शर्माने 103 सामन्यांमध्ये 311 आणि झहीर खानने 92 कसोटीत 311 बळी घेतले आहेत.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.