भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) चौथा सामना (Fourth Test) आजपासून ओव्हालमध्ये सुरु होणार आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि जो रुट (Joe Virat) यांच्यात सामना रोमांचक होणार आहे. ५ सामन्यांची १-१ अशी बरोबरीत आहे. ओव्हालमध्ये दोन्ही संघांना जिंकणे महत्त्वपुर्ण आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे ड्रा झाला होता. दुसरा सामना भारताने जिंकला होता. तर तिसरा सामन्यात इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला होता. चौथा सामना जिंकून दोन्ही संघ मालिकेत बढत घेण्याच्या तयारीत आहेत.
जाणकारांच्या मते नाणेफेक जिंकणारा कर्णधार गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. या मैदानावर शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये झाला होता. त्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी स्विकारली होती तरीही इंग्लंडने १३५ धावांनी पराभव केला होता. भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या सामन्याच्या खेळपट्टी विषयी बोल्ले तर या मैदानावर फलंदाजीला मदत मिळू शकते.
दरम्यान, भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) प्लेईंग ११ मध्ये मोठे बदल करणयाची शक्यता होती. वेगवान गोलंदाज इशांक शर्माच्या (Ishant Sharma) जागेवर रविचंद्रन आश्विन आणि जडेच्या जागेवर शार्दुल ठाकूरला जागा मिळू शकते. सुत्रांच्या माहितीनुसार खराब फार्ममध्ये असलेला अजिंक्य रहाणेही संघातून बाहेर जाऊ शकतो. त्याच्या जागेवर सुर्यकुमार यादवला जागा मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा, लोकेश राहूल/मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे/सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), आर अश्विन, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.