IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Mayank Yadav Maiden Over: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मयांक यादवने आपल्या पहिल्याच सामन्यातील पहिल्या षटकात मोठा रेकॉर्ड करुन दाखवला आहे.
IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड
mayank yadavtwitter
Published On

Mayank Yadav News In Marathi: आयपीएल २०२४ स्पर्धेत एक गोलंदाज तुफान चर्चेत राहिला. हा गोलंदाज लखनऊ सुपर जायंट्स संघातील युवा गोलंदाज मयांक यादव. आपल्या भन्नाट वेगवान गोलंदाजीच्या बळावर त्याने शिखर धवन आणि कॅमरुन ग्रीनसारख्या फलंदाजांनाही शॉक केलं होतं.

तेव्हापासूनच त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली होती. अखेर बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं. दरम्यान पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

मयांक यादवला भारताची स्पीड मशीन असंही म्हटलं जातं. आयपीएल २०२४ स्पर्धेत त्याने सर्वात जलद गतीने चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड नोंदवला होता. त्याने ताशी १५७.६ किमी गतीने चेंडू टाकला होता. त्यानंतर त्याला थेट टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली होती. मात्र शेवटच्या काही सामन्यांमध्ये तो दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं होतं. अखेर त्याने कमबॅक केलं आणि त्याला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

पहिलंच षटक निर्धाव

मयांक यादवने टी-२० आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच षटकातील सर्व चेंडू ताशी १४० पेक्षाही अधिकच्या गतीने फेकले. बांगलादेशच्या फलंदाजांकडे मयांकने विचारलेल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं.

त्याने आपल्या पहिल्याच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिलं षटक निर्धाव टाकलं आहे. यासह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच सामन्यातील पहिलं षटक निर्धाव टाकणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताचे माजी गोलंदाज आणि बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकरांनी करुन दाखवला आहे. तर अर्शदीप सिंगने देखील इंग्लंडविरुद्ध खेळताना हा कारनामा केला होता.

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड
IND vs BAN: सूर्याचा मास्टरप्लान! पहिल्या सामन्यात या दोघांना पदार्पणाची संधी; पाहा Playing XI

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच सामन्यातील पहिलं षटक निर्धाव टाकणारे गोलंदाज

  • अजित आगरकर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २००६

  • अर्शदीप सिंग विरुद्ध इंग्लंड- २०२२

  • मयांक यादव विरुद्ध बांगलादेश- २०२४

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com