IND vs AUS, Weather Update: पाऊस पुन्हा टीम इंडियाच्या मदतीला येणार? पाचव्या दिवशी कसं असेल हवामान?

India vs Australia 4th Test, Day 5 Weather Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी कसं असेल हवामान? जाणून घ्या.
IND vs AUS, Weather Update: पाऊस पुन्हा टीम इंडियाच्या मदतीला येणार? पाचव्या दिवशी कसं असेल हवामान?
melbournetwitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये सुरु आहे. हा सामना रोमांचक वळणावर येऊन पोहोचला आहे. इथून सामन्याचे तिन्ही निकाल लागणं शक्य आहे. गेल्या सामन्यातील शेवटच्या दिवशी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे या सामन्यातही पाऊस हजेरी लावणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय, दरम्यान सामन्याच्या शेवटच्या दिवशी कसं असेल हवामान? जाणून घ्या.

IND vs AUS, Weather Update: पाऊस पुन्हा टीम इंडियाच्या मदतीला येणार? पाचव्या दिवशी कसं असेल हवामान?
IND vs AUS: कशी नशिबाने थट्टा मांडली! पूर्ण दिवस गाजवला, पण शेवटच्या षटकात नको तेच घडलं

या सामन्यातील चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांची हवा पाहायला मिळाली. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या ९ फलंदाजांना लवकरात लवकर माघारी धाडलं. मात्र शेवटची जोडी फोडण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले.

शेवटी फलंदाजीला आलेले स्कॉट बोलँड आणि नॅथन लायन यांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर, ऑस्ट्रेलियाने मोठी आघाडी घेतली आहे. दरम्यान पाचव्या दिवशी भारतीय संघाला ३५० हून अधिक धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. दरम्यान शेवटच्या दिवसाचं हवामान जाणून घ्या.

IND vs AUS, Weather Update: पाऊस पुन्हा टीम इंडियाच्या मदतीला येणार? पाचव्या दिवशी कसं असेल हवामान?
IND vs AUS: बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाची फाईट सुरुच; रोहित - राहुल स्वस्तात माघारी

मेलबर्न कसोटीच्या शेवटच्या दिवशी कसं असेल हवामान?

accuweather ने दिलेल्या माहितीनुसार, मेलबर्न कसोटीच्या पाचव्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ही ४ टक्के इतकीच असणार आहे.

त्यामुळे पाऊस पडणार नाहीये. क्रिकेट चाहत्यांना पूर्ण षटकांचा सामना पाहायला मिळेल. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली होती. पाऊस फार काळ सुरु राहिला नाही.

IND vs AUS, Weather Update: पाऊस पुन्हा टीम इंडियाच्या मदतीला येणार? पाचव्या दिवशी कसं असेल हवामान?
IND vs AUS: सिराजच्या विकेटवरून हायव्होल्टेज ड्रामा; भर मैदानात पॅट कमिन्स थेट अंपायरशी भिडला, पाहा नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला ४७४ धावा करता आल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ३६९ धावा केल्या. या सामन्यातील चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ३३३ धावांची आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com