Gautam Gambhir: रोहित नाही तर कोण? कॅप्टन, ओपनर...; पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने केलं स्पष्ट!

Gautam Gambhir Press Conference: बॉर्डर गावस्कर सिरीजपूर्वी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर याची प्रेस कॉन्फर्न्स झाली, यामध्ये गंभीरने रोहितच्या उपस्थितीबाबत भाष्य केलं आहे.
gautam gambhit
gautam gambhitsaam tv
Published On

२२ नोव्हेंबरपासून भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. ५ सामन्यांच्या या टेस्ट सिरीजमधील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या सिरीजसाठी भारतीय टीमचा एक गट ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे. मात्र यावेळी रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना न झाल्याने चाहते संभ्रमात आहे. या सिरीजपूर्वी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर याची प्रेस कॉन्फर्न्स झाली, यामध्ये गंभीरने रोहितच्या उपस्थितीबाबत भाष्य केलं आहे.

रोहित शर्मा पहिला सामना खेळणार का?

या सिरीजच्या सुरुवातीपासूनच रोहित शर्मा पहिल्या सामन्यांसाठी उपलब्ध असणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. दरम्यान गंभीरला पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न करण्यात आला. पहिल्या सामन्यासाठी कर्णधाराच्या उपलब्धतेबाबत गौतम गंभीर म्हणाला, अजून याबाबत कोणतंही अपडेट नाही. तो उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. सिरीज सुरु होण्यापूर्वी टीममध्ये सामील होऊ शकतो.

gautam gambhit
Gautam Gambhir: ...तर गौतम गंभीरची हकालपट्टी होणार, ऑस्ट्रेलिया दौरा ठरणार अग्निपरीक्षा

कर्णधारपदाची धुरा कोणाकडे?

दरम्यान रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा कोणाकडे असणार असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. दरम्यान याचं उत्तरही गंभीरने दिलं आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करणार असल्याचं गंभीरने म्हटलं आहे.

रोहितच्या ऐवजी कोण करणार ओपनिंग?

सध्या टेस्ट टीममध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ओपनिंग करतात. अशातच रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची ओपनिंग जोडी कशी असू शकते, यावर गंभीरने माहिती दिलीये. गंभीर म्हणाला की, अभिमन्यू ईश्वरन टीममध्ये आहे. याशिवाय केएल राहुलचा देखील आमच्याकडे पर्याय आहे. पर्थमधील सुरुवातीच्या टेस्टपूर्वी आम्ही निर्णय घेऊ आणि कोणाला ओपनिंग द्यायची हे ठरवू. आमच्याकडे ओपनिंगसाठी आणखी बरेच पर्याय आहेत.

gautam gambhit
KL Rahul Wicket: अर्रर्रर्रर्र....! चेंडू सोडला अन् बेल्स उडाल्या, केएल राहुलची विचित्र विकेट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टेस्ट सिरीजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू इश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com