विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. अफगाणिस्तानने विश्वविजेत्या इंग्लंडवर तब्बल 69 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. इंग्लंडने स्वप्नातही विचार केला नसेल, अशी दमदार कामगिरी अफगाणिस्तानने केली. दरम्यान, या ऐतिहासिक विजयानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळालं. (Latest sports updates)
सलग दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत अफगाणिस्तानने गुणतालिकेत (World Cup 2023 Points Table) मोठी झेप घेतली आहे. या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा संघ नवव्या क्रमांकावर होता. मात्र, विजयानंतर त्यांनी तीन स्थानांची झेप घेत सहाव्या स्थानावर उडी घेतली आहे.
अफगाणिस्तानने इंग्लंडवर विजय मिळवत पाकिस्तानला चौथे स्थान गमावण्यापासून वाचवलं आहे. इंग्लंडने हा सामना चांगल्या फरकाने जिंकला असता, तर त्यांचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहचला असता. याशिवाय पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानावर घसरला असता.
दरम्यान, अफगाणिस्तानच्या या विजयाचा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला देखील मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाची दहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात सुरुवातीचे दोन सामने गमावले आहेत. (Latest Marathi News)
त्यामुळे त्यांना अजून खाते सुद्धा उघडता आलेले नाही. याशिवाय त्यांचं नेट रनरेट खूपच कमी आहे. दुसरीकडे विश्वचषकातील सलग तीन सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा संघ असून त्यांनी सुद्धा तीन सामने जिंकत ६ गुणांची कमाई केली आहे. पण नेट रनरेट टीम इंडियापेक्षा कमी आहे. पहिले दोन सामने जिंकणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे गुण समान असून पाकिस्तानी संघ चौथ्या स्थानावर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.