२०२३ च्या विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. संपूर्ण विश्वचषकात अजिंक्य कामगिरी करत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अंतिम सामन्यात एकदम थाटात एन्ट्री केलीय. रविवारी (१९, नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम सामना होईल. आत्ताचे नरेंद्र मोदी आणि पुर्वीचे मोटेरा स्टेडिअम असलेल्या या खेळपट्टीवर टीम इंडियाची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे.
अहमदाबाद स्टेडिअमवर टीम इंडियाची कामगिरी..
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना उद्या रंगणार आहे. सध्याचे नरेंद्र मोदी आणि पुर्वीचे मोटेरा स्टेडिअम टीम इंडियासाठी आत्तापर्यंत लकी ठरले आहे. या मैदानावर खेळताना भारतीय संघाने एकही विश्वचषकाचा सामना गमावला नाही. या ठिकाणी 3 एकदिवसीय विश्वचषक सामने खेळले आहेत. या तिन्हींमध्ये टीम इंडियाने बाजी मारली आहे.
भारताने २६ ऑक्टोबर १९८७ रोजी अहमदाबाद येथे झिम्बाब्वे विरुद्ध पहिला विश्वचषक सामना खेळला होता. झिम्बाब्वेने प्रथम खेळताना निर्धारित ५० षटकांत ७ बाद १९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४८ चेंडू शिल्लक असताना ७ विकेट्स राखून सामना जिंकला
टीम इंडियाचा दुसरा वर्ल्डकप सामना 2011 च्या वर्ल्ड कपवेळी अहमदाबादमध्ये झाला होता. यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. 24 मार्च रोजी झालेल्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळताना 260/6 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने हा सामना ५ गडी राखून जिंकला. त्या सामन्यात विराट कोहलीने 24 धावांची खेळी केली होती. तसेच या विश्वचषकात 14 ऑक्टोबर रोजी भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला होता. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.