World Cup 2023: ICC च्या 'या' घोषणेमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगणार? वाचा कारण

Umpire For World Cup 2023 Final : या सामन्यापूर्वीच भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे.
team india
team indiasaam tv news
Published On

ICC Announced Umpires For India vs Australia World Cup 2023 Final:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला ७० धावांनी धूळ चारली.

तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर ३ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या सामन्यासाठी आयसीसीने अंपायर्सची नावं जाहीर केली आहेत. ही नावं समोर येताच भारतीय क्रिकेट फॅन्सचं टेन्शन वाढलं आहे.

वर्ल्डकप फायनलसाठी रिचर्ड केटलबरो आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे दोघेही अंपायर्सच्या भूमिकेत असणार आहे. हे दोघेही अनुभवी अंपायर्य आहेत. यापूर्वी देखील भारताच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये रिचर्ड केटलबरो अंपायरिंग करताना दिसून आले आहेत.

हे सर्व सामने भारतीय संघाने गमावले आहेत. २०१४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये रिचर्ड केटलबरो हे अंपायरच्या भूमिकेत होते. हा सामना भारतीय संघाला गमवावा लागला होता. त्यानंतर २०१५ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यातही रिचर्ड केटलबरो हे अंपायरच्या भूमिकेत होते. या सामन्यातही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. (Latest sports updates)

team india
IND vs AUS 2023, Final: क्रिकेटप्रेमींसाठी गुड न्यूज! वर्ल्डकप फायनलसाठी मुंबईतून स्पेशल ट्रेन; चेक करा टाईमटेबल

भारतीय संघाला २०१६ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला वेस्टइंडिजकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी देखील रिचर्ड केटलबरो हे अंपायरिंग करत होते.

team india
IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतून प्रमुख खेळाडू होऊ शकतो बाहेर

भारतीय संघाने २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. मात्र शेवटी भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यातही रिचर्ड केटलबरो हे अंपयारच्या भूमिकेत होते. २०१९ वनडे वर्ल्डकपची सेमीफायनल, भारत आणि ऑसट्रेलिया यांच्यादरम्यान झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलमध्येही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यातही रिचर्ड केटलबरो हे मुख्य अंपायरच्या भूमिकेत होते.

सकारात्मक बाब म्हणजे, वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यातही रिचर्ड केटलबरो अंपायरिंगला होते. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळी इतिहास बदलणार का? यावर सर्वांचं लक्ष असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com