
इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुकने कमी कालावधीत मोठं यश मिळवलं आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती.
या सामन्यात फलंदाजी करताना त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. या दमदार कामगिरीच्या बळावर तो आपल्याच संघातील सहफलंदाज जो रुटला मागे सोडत कसोटीत नंबर १ स्थानी पोहोचला आहे. हॅरी ब्रुकची रेटींग ८९८ वर जाऊन पोहोचली आहे.
आयसीसी कसोटी फलंदाजांची ऑल टाईम रँकिंग पाहिली, तर जो रुट ३४ व्या स्थानी पोहोचला आहे. मात्र त्याने ऑल टाईम रँकिंगमध्ये अँडी फ्लॉवर (८९५), स्टीव्ह वॉ(८९५), राहुल द्रविड (८९२), महेला जयवर्धने (९९३), ग्रेग चॅपल (८८३) सारख्या दिग्गज खेळाडूंना मागे सोडलं आहे.
आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या ऑल टाईम रँकिंगमध्ये हॅरी ब्रुकने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.
सचिनची ऑल टाईम टेस्ट रँकिंग ८९८ होती. दोघेही संयुक्तरित्या ३४ व्या स्थानी आहेत. हा कारनामा हॅरी ब्रुकने न्यूझीलंडविरुद्ध खेळताना करुन दाखवला आहे. तर सचिन तेंडुलकरने २००२ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना हा कारनामा करुन दाखवला होता.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची ऑल टाईम कसोटी रँकिंग ११ व्या स्थानी आहे. विराटने २०१८ मध्ये ९३७ रेटींग पॉईँट्सची कमाई केली होती. ऑल टाईम रेटींग पॉईंट्स पाहिले, तर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानी आहेत. त्यांनी ९६१ रेटींग पॉईँट्स मिळवले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.